White Detergent Stains Remain After Washing Clothes Saam Tv
लाईफस्टाईल

White Detergent Stains Remain After Washing Clothes : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे पांढरे डाग राहतात? या टिप्स फॉलो करा

Tips Get Rid Of Laundry Detergent Stains From Clothes : साधारण कपडे धूण्यासाठी डिटर्जंटचा वापर केला जातो. कपड्यांना डाग असल्यास ते काढण्यासाठी डिटर्जंट वापरतात.

Shraddha Thik

How To Get Rid Of Detergent Stains At Home :

साधारण कपडे धूण्यासाठी डिटर्जंटचा वापर केला जातो. कपड्यांना डाग असल्यास ते काढण्यासाठी डिटर्जंट वापरतात. मात्र वॉशिंग मशीनमध्ये कपडे धूतल्यावर डिटर्जंटचे पांढरे डाग पुन्हा कपड्यावर राहतो.

तुम्हीही तुमच्या कपड्यांवर कधी ना कधी असे डाग पाहिलेच असतील. या डागांमुळे कपडे (Cloths) घालून बाहेर जाणे खूप लज्जास्पद वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ते दूर करण्याचे सोपे उपाय सांगत आहोत.

यामुळे कपड्यांवर डिटर्जंटचे डाग राहतात

कपडे धुताना डिटर्जंट जास्त आणि कमी पाणी (Water) वापरल्यास त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. याशिवाय पावडर डिटर्जंटने कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता जास्त असते.

कपड्यांवर लिक्विड डिटर्जंट वापरा

कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग टाळण्यासाठी, मशीनची सेटिंग्ज योग्य ठेवा आणि जास्त लोड देऊ नका. याशिवाय, योग्य प्रकार आणि प्रमाणात लिक्विड डिटर्जंट वापरा.

कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग कसे काढायचे

तुम्ही व्हिनेगरने कपड्यांवरील डिटर्जंटचे पांढरे डाग सहज काढू शकता. यासाठी कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर चांगले मिसळा आणि त्यात कपडे 15 मिनिटे भिजवा. यानंतर, डाग असलेली जागा हाताने हलके चोळा, स्वच्छ (Clean) पाण्याने धुवा आणि सुकवून पाहा. डाग पूर्णपणे गायब होतील.

ही पद्धत देखील आश्चर्यकारक आहे

तुम्ही डिश शॉपमधून कपड्यांवरील डिटर्जंटचे पांढरे डाग देखील काढू शकता. यासाठी डाग पडलेला भाग 5 मिनिटे पाण्यात भिजवावा. नंतर त्यावर डिश सोप चोळा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. डिश सोपऐवजी तुम्ही आंघोळीचा साबण देखील वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले अन्...; वसईतल्या कार्यक्रमात थरारक प्रसंग|VIDEO

Chakan Fort : पुण्यातील चाकण किल्ला पाहिला का? सुट्टीत मुलांसोबत नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमधील फर्निचर मार्केटजवळ इमारतीचा सज्जा कोसळला; एका कामगाराचा मृत्यू

Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी विसरु नका

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

SCROLL FOR NEXT