Yoga for Mental Health (Details in Marathi) Saam tv
लाईफस्टाईल

Mental Health सुधारण्यासाठी नियमित करा ही योगासने, मन राहिल शांत; तणावापासून राहाल दूर

Best Yoga for Mental Health: सध्या अनेक तरुण मानसिक आरोग्याने ग्रस्त आहेत. तणाव, चिंता, अपुरी झोप, नैराश्य यामुळे अनेकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्ही देखील या समस्येमुळे त्रस्त असाल तर नियमितपणे काही योगासने केल्याने फायदा होईल.

कोमल दामुद्रे

Yoga Exercise For Mental Health:

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही जपणे आवश्यक आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण कामामुळे अधिक व्यस्त झालो आहोत. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे लक्ष तर देतोच पण मानिसक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

जितके आपले शरीर उत्तम असायला हवे तितकेच मानसिक आरोग्य देखील चांगले असायला हवे. सध्या अनेक तरुण मानसिक आरोग्याने ग्रस्त आहेत. तणाव (Stress), चिंता, अपुरी झोप, नैराश्य यामुळे अनेकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्ही देखील या समस्येमुळे त्रस्त असाल तर नियमितपणे काही योगासने केल्याने फायदा होईल.

मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) तुम्ही भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तानासन, बालासन यांसारखे योगासने करायला हवे. तसेच ही योगासने (yoga) केल्याने आरोग्याला काय फायदा होतो हे जाणून घेऊया.

1. स्मरणशक्ती वाढते

वाढत्या वयाबरोबरच स्मरणशक्ती कमी होऊ लागते. परंतु, तुम्हाला लहान वयात या गोष्टी जाणवत असतील तर तुम्हाला योगासने करण्याची गरज आहे. यामुळे तुमचा मेंदू तीक्ष्ण होईल. तसेच नवीन पेशींची वाढ होण्यास मदत होतील.

2. चांगली झोप येण्यास मदत

व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. व्यायाम केल्याने शरीर थकते ज्यामुळे झोप शांतपणे लागते.

3. मूड चांगला राहिल

रोज व्यायाम केल्याने नकारात्मकतेपासून दूर राहाल. तसाच तुमचा मूड सुधारण्यास मदत होईल. यामुळे तुमच्या मनाला शांती देखील मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT