दिवाळीच्या दिवसात लक्ष्मी पुजेसोबत गोवर्धन पुजा देखील करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. म्हणजेत कार्तिक शुक्ल प्रतिपदा तिथीला ही पुजा करण्यात येते. निसर्गाच्या उपासनेचा हा महान उत्सव प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये साजरा केला जातो.
या दिवशी अन्नकूट देखील होतो. अन्नकूट म्हणजे यावेळी देवाला 56 नैवेद्य अर्पण केले जातात. गोवर्धन पूजेची परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आली असून त्याची सुरुवात ब्रजपासून झालीये. या दिवशी गायीची पूजा करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हणून पूजलं जातं. दिवाळीप्रमाणे यंदाही गोवर्धन पूजेच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.
पंचांगानुसार, गोवर्धन पूजा म्हणजेच कार्तिक शुक्ल प्रतिपदा तिथी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 वाजता सुरू होणार आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जाणार आहे. याशिवाय गोवर्धन पूजेसाठी तीन शुभ मुहूर्त असून पहिला मुहूर्त - सकाळी 6.34 ते 8.46 पर्यंत तर दुसरा शुभ मुहूर्त 3:23 ते 5:35 पर्यंत आणि तिसरा शुभ मुहूर्त 5:35 ते 6:01 पर्यंत असणार आहे.
गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तेलाने मसाज करून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण टाकून गोवर्धन पर्वताचा आकार तयार करा.
या सभोवताली गाई, झाडे आणि वनस्पतींचे आकार काढा.
गोवर्धन पर्वताच्या मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
विधीनुसार गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्णाची पूजा करावी.
पंचामृत व ५६ भोग अर्पण करावेत. मग तुमची इच्छा भगवान श्रीकृष्णाला सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा.
डिस्क्लेमर- आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.