WhatsApp Purple Circle: What Does The New Close Friends Feature Mean? saam tv
लाईफस्टाईल

तुमच्याही व्हॉट्सॲप मध्ये दिसतंय गोलकार चिन्हं? WhatsApp मध्ये दिसणारं Purple Circle नेमकं काय आहे?

WhatsApp's New Close Friends Feature : व्हॉट्सॲपमध्ये दिसणारे जांभळे गोलाकार चिन्ह हे Close Friends किंवा निवडक कॉन्टॅक्ट्ससोबत शेअर केलेल्या स्टेटसचे फीचर आहे. या फीचरमुळे युजर्सना स्टेटस कोणाला दाखवायचे हे ठरवता येते.

Bharat Jadhav

तुम्ही व्हॉट्सॲप वापरताय का? तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये गोलकार चिन्ह दिसतंय का? हो, काय आहे ते चिन्ह? असा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. तुमच्या अॅपमध्ये दिसणारं गोलकार चिन्ह हे एक फिचर आहे. व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी एक नवीन 'क्लोज फ्रेंड्स' (Close Friends) फीचर आणत आहे. इन्स्टाग्रामवर ज्या प्रकारे सुविधा उपलब्ध आहे, त्याच धर्तीवर, याद्वारे युजर्स आपला व्हॉट्सॲप स्टेटस केवळ मित्र आणि जवळच्या ओळखीच्या व्यक्तींच्या निवडक गटासोबत शेअर करू शकतील.

विशेष म्हणजे, 'क्लोज फ्रेंड्स' सोबत शेअर केलेले स्टेटस अपडेट्स एका विशिष्ट जांभळ्या रंगाच्या रिंगद्वारे आणि इमोजीद्वारे ओळखले जातील. आता तुम्हाला तुमचे प्रत्येक स्टेटस अपडेट तुमच्या संपर्कातील लोकांना स्टेट्स दिसणार नाही.

व्हॉट्सॲपचे 'क्लोज फ्रेंड्स' (Close Friends) फीचर कधी सुरू होणार

या व्हॉट्सॲप फीचरबद्दलची चर्चा फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू झाली. त्यावेळी, अँड्रॉइड बीटा आवृत्ती २.२६.५.१३ मध्ये हे फीचर विकसित होत असताना दिसून आले होते. मे २०२६ मध्ये अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) वरील काही निवडक बीटा युजर्ससाठी या फीचरची चाचणी सुरू झाली. आता नोव्हेंबर २०२६ मध्ये, हे फीचर हळूहळू अधिक युजर्सपर्यंत पोहोचवले जात आहे. मात्र ते अद्याप सर्व युजर्सपर्यंत उपलब्ध झालेले नाहीये.

व्हॉट्सॲपचे 'क्लोज फ्रेंड्स' फीचर कसे काम करते?

स्वतंत्र 'क्लोज फ्रेंड्स' यादी: युजर्स त्यांच्या पसंतीच्या संपर्कांना एका स्वतंत्र यादीत जोडू शकतील. या यादीत कोणालाही कधीही समाविष्ट केले जाऊ शकते किंवा त्यातून काढून टाकले जाऊ शकते. Close Friends यादीत डिफॉल्टपणे स्टार इमोजी मिळतं असतं. युजर्स त्यांच्या सूचींना स्वतःची नावे आणि इमोजी देखील देऊ शकतात.

Purple Ring indicator: 'क्लोज फ्रेंड्स' सोबत शेअर केलेल्या स्टेटसभोवती जांभळ्या रंगाचे वर्तुळ दिसते. हे दर्शवते की, तो अपडेट एका विशिष्ट, निवडक प्रेक्षकवर्गासाठी आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या व्यक्तींना त्याबद्दल कोणतीही सूचना मिळणार नाही. तसेच, या यादीत इतर कोणाकोणाचा समावेश आहे, हे पाहण्याची सुविधाही त्यांना नसेल.

WhatsApp मध्ये Close Friends फीचरचा वापर कसा कराल?

आधी WhatsApp सुरू करा, Updates सेक्शनमध्ये जा.

Status अपडेट करण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ निवडा.

Status ची ऑडियन्स निवडण्याच्या पर्यायाला निवडा.

Close Friends ची यादी निवडा, तेथे तुमचं Status शेअर करा.

जर तुमच्या WhatsApp मध्ये Close Friends फीचर दिसत नसेल तर आधी Google Play Store किंवा Apple App Store मध्ये जा. तेथे WhatsAppला अपडेट करा. जर हे फिचर अजूनही दिसत नसेल, तर कदाचित ते तुमच्या खात्यासाठी अद्याप उपलब्ध करून दिले गेलेले नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms : प्रत्येकवेळी छातीत कळ आली म्हणजे हार्ट अटॅक नाही, त्याआधी शरीर देतं 5 संकेत

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Mangalsutra Vati Design: नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या हटके वाटी डिझाइन्स; पारंपरिक अन् मॉडर्न कलेक्शन पाहिलंत का?

BJP Leader Arrested : घरात आढळल्या ६४५ दारूच्या बाटल्या, भाजप नेत्याला अटक, राजकारणात खळबळ

Union Cabinet: बंदरे ते एअरपोर्ट, 19,934 कोटींचा खर्च; केंद्राकडून ५ योजनांना मंजुरी, वाचा मोदी सरकारनं घेतलेले ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT