WhatsApp Update google
लाईफस्टाईल

WhatsApp Update : WhatsApp वर चॅटींग करण्यासाठी यापुढे द्यावे लागणार पैसे, नव्या अपडेटमुळे कोणकोणत्या गोष्टी बदलणार?

WhatsApp Plus : व्हॉट्सअ‍ॅप प्लस या नव्या पेड प्लॅनमुळे चॅटिंगसाठी पैसे लागणार का याची चर्चा सुरू आहे, पण बेसिक फीचर्स मोफत राहणार असून कस्टमायझेशनसाठी अतिरिक्त फीचर्स मिळणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

WhatsApp हे जगातलं सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ''WhatsApp Plus'' नावाच्या नव्या प्रीमियम प्लॅनबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागतील का? असा प्रश्नही यूजर्सना पडला आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे आणि सामान्य यूजर्सना घाबरण्याची गरज नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp Plus हा एक पेड सब्सक्रिप्शन प्लॅन असणार आहे. पण याचा परिणाम अ‍ॅपच्या बेसिक वापरावर होणार नाही. म्हणजेच, मेसेज पाठवणं, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करणं तसेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसारख्या सुविधा पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहेत. त्यामुळे रोजच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

WhatsApp Plus हा प्लॅन विशेष यूजर्ससाठी तयार केला जात. ज्यांना अ‍ॅपमध्ये जास्त कस्टमायझेशन आणि एक्स्ट्रा फीचर्स हवेत. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना वेगवेगळ्या थीम्स, खास स्टिकर्स आणि अ‍ॅपचा आयकॉन बदलण्याची सुविधा मिळू शकतं. यामुळे यूजर्स आपल्या आवडीनुसार WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलू शकतील.

तसेच जास्त चॅट्स पिन करण्याचा पर्याय, आवडत्या कॉन्टॅक्ट्ससाठी वेगवेगळे रिंगटोन आणि नोटिफिकेशन सेट करण्याची सुविधा या प्लॅनमध्ये मिळू शकते. त्यामुळे चॅटिंगचा फील जास्त पर्सनल आणि सोयीस्कर होईल. सध्या हे फीचर लिमीटेड असून यूजर्ससाठी टेस्टिंग टप्प्यात आहे. विशेषतः अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर त्याची चाचणी सुरू आहे. पुढील काळात हे फीचर्स टप्प्याटप्प्याने सर्व यूजर्सपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं.

महत्त्वाची बाब म्हणजे, ही सुविधा फक्त WhatsApp Messenger साठीच उपलब्ध असेल आणि बिझनेस अ‍ॅपमध्ये दिली जाणार नाही. सब्सक्रिप्शनची पद्धत सुद्धा सोपी असणार आहे. यूजर्स अ‍ॅपच्या सेटिंग्समधून हा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह करू शकतील आणि एकदा सुरू केल्यानंतर तो दर महिन्याला आपोआप रिन्यू होईल. पेमेंट अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून केलं जाईल आणि सर्व फीचर्स त्याच अकाउंटने मॅनेज करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT