मुंबई : व्हाट्सअॅप ( Whatsapp ) सध्या जगभरातील लोकांकडून वापरण्यात येणारे प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या आधारे एकमेकांना ऑडिओ आणि व्हिडीओ पाठवू शकतो. तसेच मेसेज, फोटो देखील दुसऱ्या वापरकर्त्यांना पाठवू शकतो. हे सर्व व्हाट्सअॅपचे साधारण फीचर आहेत. मात्र, एक व्हाट्सअॅपचे असे एक फीचर आहे, ज्यामुळं तुमचे पर्सनल चॅट (Chat ) कोण वाचतं का ? याची माहिती मिळू शकते. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या व्हाट्अॅपला 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' आहे, मग दुसरा व्यक्ती कसा काय वाचू शकतो. मात्र, व्हाट्अॅपचे असे एक फीचर आहे, त्याचा वापर करून तुमचे व्हाट्सअॅपवरील पर्सनल मेसेज ( Message ) वाचणाऱ्यांना रोखू शकतो. तुमची छोटीशी चूक दुसऱ्यांना व्हाट्सअॅपवरील मेसेज वाचायला संधी देऊ शकते. त्यामुळं हा प्रकार कसा रोखता येऊ शकतो, हे जाणून घ्या. (Whatsapp Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
काय आहे व्हाट्अॅप वेब ?
व्हाट्सअॅप वेब (Whatsapp Web ) हे फीचर आहे, ज्या फीचरचा वापर करून तुमचे वैयक्तिक मेसेज दुसऱ्यांनी वाचण्यापासून रोखू शकता. हेच व्हाट्सअॅप वेब हे कॉम्प्युटर वापर करणाऱ्या लोकांसाठी खूर मदतगार ठरते. या फीचरच्या मदतीनं युजर त्याचे व्हाट्सअॅप अकाऊंट हे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरू शकते. त्यासाठी तुम्हाला सतत लॉगिन करण्याची गरज नाही. मात्र, या फीचरचा दुरुपयोग हा आहे की, या फीचरच्या मदतीने दुसरा व्यक्तीही चोरून व्हाट्सअॅप अकाऊंट वापरू शकतो.
तुमचे व्हाट्सअॅप दुसरा व्यक्ती कसा वापरू शकतो ?
तुमचा मोबाईल हा दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागला. त्यात तुमच्या मोबाईल हा अनलॉक असेल, तर अगदी सहजतेने अन्य व्यक्ती व्हाट्सअॅप वेबच्या सहाय्याने तुमचं व्हाट्सअॅप अकाऊंट वापरू शकतो. तसेच तुम्ही करत असलेल्या वैयक्तिक चॅट्स देखील वाचू शकतो. तुमच्या सहजतेने नजर ठेवू शकतो.
कशी माहिती मिळवू शकता ?
तुम्हाला संशय वाटत आहे की, कोणीतरी तुमचे व्हाट्सअॅप चॅटिंग वाचत आहे. तर तुम्ही तुमच्या व्हाट्सअॅप अकाऊंटमधील लिंक्ड डिव्हाइसची माहिती जाणून घेऊ शकता. त्या फीचरमुळं तुमच्या व्हाट्सअॅप अकाऊंटला कोणाचे डिव्हाइस लिंक आहेत, याची सहजतेने माहिती मिळेल. तुमच्या डिव्हाइसच्या यादीत अशी नावे आहेत, ज्यांची माहिती ठाऊक नाही, अशा डिव्हाइस हटवू शकता. त्या फीचरमार्फत सहजतेने तुमचे व्हाट्सअॅपवरील मेसेज कोणी वाचले, याची माहिती मिळू शकते. या माहितीमुळं समजू शकते की, तुमचे व्हाट्सअॅप मेसेज कोणीही वाचू शकते. त्यामुळं तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.