Whatsapp News Saam TV
लाईफस्टाईल

WhatsApp ने बॅन केले तब्बल 18.58 लाख भारतीयांचे अकाउंट्स, ‘हे’ आहे कारण

जगामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) मोठी कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) मोठी कारवाई केली आहे. कंपनीने जानेवारी २०२२ दरम्यान १८.५८ लाख भारतीयांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स (WhatsApp Account) बॅन (Ban) करण्यात आले आहे. कंपनीने मंगळवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती दिली आहे. कंपनीने (company) नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्याकरिता आणि त्यांचा शोध घेण्याकरिता तक्रार विभाग आणि त्यांच्या सिस्टमद्वारे युजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. (WhatsApp accounts lakh Indians banned)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp ला ४९५ भारतीय अकाउंट विरोधामध्ये तक्रारी आले होते. त्यापैकी २८५ WhatsApp Accounts बंद करण्याचे सांगण्यात आले होते. यापैकी २४ व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८.५८ लाख पैकी जास्त अकाउंट्सवर कंपनीने नुकसानकारक वर्तनाच्या आधारावर बंदी घातली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये कंपनीने २० लाखहून जास्त भारतीय (Indian) अकाउंट्स बॅन करण्यात आले होते. डिसेंबरमध्ये २,७९,००० भारतीय युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद करण्यात आले आहे. नव्या IT नियम २०२१ नुसार, कंपनीने सांगितले आहे, की त्यांना फेक अकाउंटकरिता ५२८ तक्रारी आले होते. त्यापैकी २४ अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे.

WhatsApp ने १६ जून ते ३१ जुलै २०२१ दरम्यान ५९४ तक्रारी मिळाल्यावर ३,२७,००० भारतीय युजर्सचे अकाउंट्स बंद करण्यात आले होते. ९५ टक्के प्रकरणामध्ये स्पॅम मेसेजने अकाउंट्स बॅन केल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले होते. जागतिक स्तरावर WhatsApp ने १ जून ते जुलै २०२१ या महिन्यामध्ये जवळपास ८० लाख अकाउंट्स बॅन करण्यात आले होते. युजर्सची सुरक्षा लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शन शिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आले असलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागत आहे. त्याच रिपोर्टमध्ये WhatsApp ने कारवाईची माहिती दिली आहे.

Edited By-Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT