Education
Education Saam Tv
लाईफस्टाईल

Sex Educationसाठी मुलांचं योग्य वय अन् पालकांनी काय करावं? जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sex Education: सेक्सचे नाव ऐकले की लोकांचे कान उभे आणि भुवया उंचावतात. पण परदेशात तर सेक्स हा शब्द सर्रासपणे बोलला जातो. जर भारताबाबत बोलायचे झाले तर काही लोक सेक्स हा शब्द उच्चारताना आपला आवाज कमी करतात, हळू आवाजात बोलतात. आजही भारतातील लोक सेक्स या शब्दाबद्दल उघडपणे बोलण्यास टाळतात. तर दुसरीकडे, मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा मुद्दा आला, तर भारतीय पालक यापासून नेहमीच दूर पळतात. देशात क्वचितच असे पालक असतील जे आपल्या मुलांशी सेक्सबद्दल उघडपणे बोलत असतील. आजच्या काळात लैंगिक शिक्षण देणे पालकांसाठी खूप महत्वाचे आहे.

प्रत्येक गोष्टीबद्दल मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, बऱ्याचदा पालक मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात पण सेक्सबद्दल कोणतीही ते माहिती देत ​​नाहीत, त्यामुळे मुलांना याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते आणि अधिकाधिक याबद्दल प्रश्न विचारले जातात. आपण खूपदा असे ऐकले असेल, जेव्हा लहान मुले त्यांच्या पालकांना विचारतात की ते या जगात कसे आले, तेव्हा पालक त्यांना उत्तरात सांगतात की त्यांना या जगात परींनी आणले आहे.

लैंगिक आरोग्य शिक्षण समन्वयक लॉरेन ओ'कॉनेल म्हणतात की, आत्ताच्या तरुण पिढीला लैंगिकतेबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे पण याचा अर्थ असा नाही की त्यांना ते करायचेच आहे. त्यांना याबद्दल जाणून घ्यायचे आहे कारण या विषयावर बरेच काही लपवून बोलले जाते. ज्यामुळे त्याच्या मनात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, मुलांना लैंगिक संबंधांची माहिती देणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते लहान वयात लैंगिक गोष्टी करू नयेत, तारुण्यात न कळत, चुकून होणाऱ्या गर्भधारणा रोखू शकतील आणि लैंगिक संक्रमित संसर्गाचा (STIs) धोका कमी करू शकतील.

लॉरेनने सांगितले की त्यांच्या लक्षात आले की, आजच्या काळात तरुण पिढीमध्ये सेक्स चॅटिंग आणि एकमेकांना न्यूड्स पाठवणे खूप सामान्य झाले आहे. ज्यामुळे तरुण पिढी मोठ्या अडचणीत येऊ शकते. अशा परिस्थितीत, माध्यमिक शाळेत जाण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांशी लैंगिक संबंधांबद्दल थोडे का होईना बोलणे महत्वाचे आहे. लॉरेनने पालकांसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत जेणेकरुन ते कोणत्याही संकोच न करता आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देऊ शकतील.

जाणून घ्या काही टिप्स-

-स्वतःला कधीही, कोणत्याही प्रश्नांसाठी तयार करा, जेणेकरून तुम्हला राग येणार नाही आणि त्यांना तुम्ही त्या प्रश्नामुळे शांत करणार नाही.

- तुमच्या मुलाने तुम्हाला सेक्सशी संबंधित कोणताही प्रश्न विचारला तरी त्यावर जास्त प्रतिक्रिया देऊ नका.

- कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार देऊ नका, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नसेल, तर मुलाला स्वतःहून त्याबद्दल माहिती गोळा करण्यास सांगा आणि नंतर नक्कीच त्याबद्दल विचारा.

-तुमच्या मुलाला पालक म्हणून नव्हे, तर मित्र किंवा तज्ञाप्रमाणे समजावून सांगा.

- मुलांना शरीराच्या अवयवांबद्दल सांगताना योग्य संज्ञा/ शब्द वापरा. जर तुम्ही शरीराच्या अवयवांना इतर कोणत्याही नावाने संबोधत असाल तर त्यांना असे वाटेल की शरीराच्या अवयवांचे योग्य नाव वापरणे ही चुकीची गोष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT