Cholesterol Symptoms Freepik
लाईफस्टाईल

Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा क्षणार्धात होतील साफ, फक्त सकाळी उठून प्या 'हा' ज्युस

Cholesterol Symptoms: जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा नसा ब्लॉक व्हायला सुरुवात होते. त्यालाच एथेरोस्क्लेरोसिस म्हंटले जाते. त्याने शरीराला मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता असते.

Saam Tv

जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा नसा ब्लॉक व्हायला सुरुवात होते. त्यालाच एथेरोस्क्लेरोसिस म्हंटले जाते. त्याने शरीराला मोठ्या प्रमाणात धोका होतो, तसेच त्रास सुद्धा सहन करावा लागतो. त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या माहितीनुसार तुमच्या आहारात किंवा सेवनात काही आवश्यक बदल करू शकता. त्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलमुळे होणारा त्रास घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतीने नष्ट होईल.

कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा चरबीसदृश पदार्थ (लिपिड) आहे जो शरीरासाठी आवश्यक असतो. तो पेशींच्या संरचनेत, संप्रेरक (हार्मोन्स) तयार करण्यात आणि जीवनसत्त्व D तयार करण्यात मदत करतो. परंतु, शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त झाल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

कोलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यासाठी उपाय

कोलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यासाठी तुम्ही ग्रीन टी, ओट ड्रिंक्स आणि प्लांट मिल्क स्मुदीचे सेवन करू शकता. त्यात तुमच्य्या आवडीच्या ड्रिंकचे सेवन तुम्ही करू शकता. या ड्रिंक्समध्ये असणारी संयुगे तुमचा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करू शकतात.

तुम्ही रोजच्या आहारात आवळा आणि गाजराच्या ज्युसचे सेवन करू शकता. आवळा आणि गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हे दोन्ही पदार्थ आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन c चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्ऱॉल आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकते. तर गाजरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात बीटा - कॅरोटीन असतात. त्याने आपल्या नसांमध्ये असणारी घाण साफ होते. त्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

आवळा आणि गाजराचे सेवन कसे करावे?

कोलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यासाठी २ आवळे, थोडे पाणी, १ चमचा मध आणि स्वच्छ असलेले गाजर घ्या. आता आवळा आणि गाजर बारिक कापून घ्या आणि मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. त्यात थोडे आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा. आता तयार ज्युस तुम्ही मधासोबत सकाळी उठल्यावर सेवन करू शकता. किमान १५ दिवस या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT