Heart Valve Disease saam tv
लाईफस्टाईल

Heart Valve Disease: हृदयाच्या झडपांचा आजार काय असतो? जाणून घ्या यामागील कारणं काय असतात?

Heart Valve Disease: हृदयाच्या झडपांचे आजार नेमके काय असतात? हे आजार कोणत्या कारणांमुळे हे होतात, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

आतापर्यंत आपण हॉर्ट अटॅक किंवा हॉर्ट फेल्युअर बद्दल ऐकलं असेल. हे हृदयासंबंधीचे आजार आहेत. मात्र वाढतं वय, जन्मजात दोष आणि इनफेक्शन यांच्यामुळे हृदयाच्या झडपाचा आजार होऊ शकतो. हृदयाच्या झडपांचे आजार नेमके काय असतात? तसंच कोणत्या कारणांमुळे हे आजार होतात, ते पाहूयात.

हृदयाच्या झडपा नेमक्या किती आणि कोणत्या?

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, हृदयाच्या चार झडपा असून त्या मायट्रल, ट्रायकस्पिड, पल्मोनरी आणि ॲऑर्टिक आहेत. या झडपांना त्यांच्या प्रकाराप्रमाणे काही पाती असतात- जी हृदय आकुंचन पावल्यावर उघडतात आणि रक्ताचा प्रवाह होण्यास पुढील वाट करून देतात. दोन ठोक्यांच्यामध्ये या पाती बंद होतात.

हृदयाला असणाऱ्या या पाती उघडणं आणि बंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला, तर हृदयावर आणि पर्यायाने फुप्फुसावर जास्त ताण वाढू शकतो. तसंच स्टेनोसिस आणि रेगर्गिटेशन हे हृदयाच्या झडपांचे दोन मुख्य प्रकार आहेत, असंही डॉ. भामरे यांनी सांगितलंय.

हृदयाच्या झडपांच्या समस्यांचे प्रकार

झडप छोटी अथवा आकुंचित होणं (स्टेनोसिस)

या समस्येमध्ये झडप जाड होते आणि पाती एकमेकांना चिकटतात. यावेळी रक्त बाहेर जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या कप्प्यामधील दाब वाढू लागतो. यामुळे शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.

झडप गळकी होणं (रेगुरजिटेशन)

यामध्ये झडपांची पाती पूर्णपणे बंद होत नाहीत. परिणामी प्रवाहातील रक्त त्याच कप्प्यात मागे फिरतं. यामुळे हृदयावर जास्त रक्त पंप करायला लागून ताण वाढू लागतो. या समस्येमध्ये रूग्णाला थकवा, खोकला आणि झोपताना श्वास घेण्यास त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात.

हृदयाच्या झडपांच्या आजाराची कारणं

जन्मजात दोष

काही लोक जन्मतःच हृदयाच्या झडपाच्या विकृतीसह जन्माला येतात. अनेकदा या दोषांमुळे व्हॉल्व्हचा आकार चुकीचा असू शकतो. ज्यावेळी हृदयाच्या झडपांचा विकास योग्यरित्या होत नाही तेव्हा हृदयाच्या झडपांचे आजार होण्याचा धोका असतो. यामुळे हृार्ट फेल्युअर, विस्तारित कार्डिओमायोपॅथी आणि महाधमनी धमनीविकार यासारख्या विविध गंभीर आरोग्य स्थिती होऊ शकतात.

वाढतं वय

वाढत्या वयाबरोबर हृदयाच्या झडपा दाट आणि कडक होऊ लागतात. ज्यामुळे रक्त प्रवाह मर्यादित होतो. यामुळे अशा प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढू लागतो.

संसर्ग

एंडोकार्डायटिस हा हृदयाच्या झडपांसह हृदयाच्या आतील अस्तरांच्या संसर्गाचा एक प्रकार आहे. विविध बॅक्टिरिया किंवा बुरशी या हृदयाच्या व्हॉल्व्हवर हल्ला करू शकतात ज्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशामध्ये खराब झालेले वॅाल्व योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, ज्यामुळे स्टेनोसिस किंवा रेगर्गिटेशन होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT