Bipolar disorder, Health issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय ? ते कसे ओळखाल?

बायपोलर डिसऑर्डर होण्याची कारणे कोणती

कोमल दामुद्रे

मुंबई : बायपोलर डिसऑर्डर हा एकप्रकाराचा मानसिक विकार असून, त्यामुळे व्यक्तीत अतिसक्रियता, मूडमध्ये बदल होणे यांसारखे प्रकार दिसत असतात.

हे देखील पहा -

बायपोलर डिसऑर्डर यात दोन अवस्था असतात ज्याला एपिसोड्रस म्हणतात. यामध्ये डिप्रेशन म्हणजे नैराश्याची स्थिती असते. हा आजार फक्त वयोवृध्दांना होत नाही तर यांचे प्रमाण सध्या तरुणांमध्ये देखील दिसून येत आहे. या आजाराचे वय हे सामान्यत: २५ वर्षापासून सुरु होते. हा आजार झाल्यानंतर अचानक मूड बदलतात त्यामुळे त्याचा आपल्या नात्यावर (Relation) विपरीत परिणाम होऊ लागतो.

कसे ओळखाल ?

बायपोलर डिसऑर्डर ह्या आजारात व्यक्तीच्या वागण्यात बदल होतात. रुग्ण एक तर नैराश्याचा शिकार होतो वा खूप जास्त सक्रिय होतो. काही लोक स्वभावत: मूडी वा हायपरअॅक्टिव्ह असतात. याचा अर्थ ते आजारी असतात असा नव्हे, पण अचानक त्यांच्या स्वभावात बदल झाला वा ते नैराश्याने घेरले गेले, तर बायपोलर डिसऑर्डर असू शकतो. नैराश्यात व्यक्ती अजिबात निष्क्रिय होतो, तर उन्मत्ततेत याच्याउलट अतिसक्रिय होतो. या प्रकाराचे लोक एकाचवेळी दु:खी, एकाकी, नैराश्याने ग्रस्त पण यांच्यात भरपूर ऊर्जा असू शकते. सुरुवातीला रुग्णाला या बदलांची जाणीव होते, पण समस्या गंभीर झाल्यानंतर त्यांना बदल जाणवत नाही.

लक्षणे -

सुमारे ५० टक्के लोकांमध्ये हा आजार (Disease) आनुवंशिक असतो. सर्वप्रथम आपण त्यांना वेडसर समजण्याची चूक करता कामा नये. याची लक्षणे ओळखून त्वरित एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. यात अचानक आत्मविश्वास कमी होणे, कोणतीही गोष्ट चांगली न वाटणे, शारिरीक ऊर्जेचा अभाव, जास्त चिंताग्रस्त राहाणे, १२ ते १६ तास झोपूनही झोप पूर्ण न होणे. यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT