मृत्यूपूर्वीच जीवन आपण जगतो, मात्र मृत्यूनंतरच जीवन काय आणि कसं असतं, हा सर्वांना असलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान याबाबत संशोधन सुरु असून लवकरच याबाबत उलगडा होईल अशी आशा आहे. मुळात जीवन आणि मृत्यू हे परस्परविरोधी मानले जात असून या दोघांच्या पलिकडे काय आहे याचा कधी विचार केला आहे का?
मृत जीवांच्या पेशींमधून नवीन बहुकोशिकीय जीवन स्वरूपाची ( new multicellular life forms ) निर्मिती एक 'तिसरी अवस्था' दर्शवते. दरम्यान जी जीवन आणि मृत्यूच्या पारंपारिक सीमांच्या पलीकडे जाते. सध्याच्या काळात अवयवदानासारख्या काही प्रथा आहेत, ज्या ब्रेनडेड झाल्यानंतर अवयव, ऊती आणि पेशी कसं कार्य करत राहू शकतात हे दाखवतात. अशावेळी मेंदू मृत झाल्यानंतर कोणत्या यंत्रणा पेशींना कार्य चालू ठेवू देतात हा प्रश्न समोर येतो.
'Physiology' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात संशोधकांनी मृत्यूनंतर आत काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पेशी - जेव्हा पोषक तत्त्व, ऑक्सिजन, बायो इलेक्ट्रिसिटी किंवा जैवरासायनिक संकेत पुरवले जातात. तेव्हा - मृत्यूनंतर नवीन काम करण्यासह बहुकोशिकीय जीवांमध्ये बदलण्याची क्षमता कशी असते याचं त्यांनी वर्णन करण्यात आलंय.
ही तिसरी अवस्था संशोधकांसाठी पेशींचं कार्य समजण्यासाठी कठीण आहे. अशी फार कमी उदाहरणं आहेत ज्यामध्ये जीवांमध्ये घडणारे बदल . ट्यूमर, ऑर्गनॉइड्स आणि सेल लाईन्स जे पेट्री डिशमध्ये विभाजित करू शकतात ते तिसऱ्या टप्प्याचा भाग मानले जात नाहीत कारण ते नवीन काम करत नाहीत.
संशोधकांना असं आढळून आलं की, मृत पावलेल्या बेडकाधून काढलेल्या त्वचेच्या पेशी प्रयोगशाळेतील पेट्री डिशच्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत. त्यांनी स्वतः बहुपेशीय जीवांमध्ये बदल केला, ज्यांना झेनोबॉट्स म्हणतात. संशोधकांना असंही आढळून आलं की, मानवी फुफ्फुसाच्या पेशी स्वतःच सूक्ष्म बहुपेशीय जीवांमध्ये बदलू शकतात जीवामध्ये फिरू शकतात.
हे संशोधन असं सांगतं की, cellular System फार लवचिक आहे. संशोधनाचे परिणामांनुसार, पेशी आणि जीव केवळ पूर्वनिर्धारित मार्गांनी विकसित होऊ शकतात याबाबत विचार करायला भाग पाडतात. तिसरी अवस्था असं दर्शवते की, जीवनात कालांतराने होणाऱ्या बदलांमध्ये जीवांचा मृत्यू महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.