Viral Attack Saam TV
लाईफस्टाईल

Rare Sensorineural Hearing Loss : व्हायरल अटॅक म्हणजे काय? वाचा अलका याज्ञिक यांना झालेल्या आजाराची लक्षणे आणि कारणं

Rare Sensorineural Hearing Loss : अलका यांना झालेल्या या आजारामुळे आता सोशल मीडियावर या आजाराचीच मोठी चर्चा रंगली आहे. व्हायरल अटॅक नेमका काय आहे? तो कसा होतो?

Ruchika Jadhav

सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना एक दुर्मिळ आजार झाला आहे. व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येणं बंद झालं आहे. त्यांनी स्वत:सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अलका यांना झालेल्या या आजारामुळे आता सोशल मीडियावर आजाराचीच मोठी चर्चा रंगली आहे. व्हायरल अटॅक नेमका काय आहे? तो कसा होतो? तसेच यातून बरे होण्यासाठी काय उपचार घ्यावेत याची माहिती यातून जाणून घेणार आहोत.

व्हायरल अटॅक काय आहे?

रेयर सेंसरी न्यूरल नर्व हियरिंग लॉस असं या आजाराचं नाव आहे. अनेकदा विविध आजारांमुळे व्यक्तीचे अवयव हळूहळू काम करणं बंद करतात. ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर अनेकांना कमी ऐकू येतं. हे कॉमन आहे. मात्र अचानक ऐकू येणं बंद झालं तर हा हियरिंग लॉस असा दुर्मिळ आजार आहे. यावर वेळीच उपचार न घेतल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.

व्हायरल अटॅकची कारणे

अचानक हा आजार जाणवतो. त्यामुळे त्याचं ठोस कारण सांगता येत नाही.

साधारणता ४० ते ५० या वयोगटातील व्यक्तींना या आजाराचा धोका उद्भवू शकतो.

कानातील मळ साफ न करणे, कानाला संसर्ग होणे, सुज येणे यामुळे देखील हा आजार होण्याची शक्यता आहे.

लक्षणे

कमी ऐकू येणे

कान जड होणे

कानाला सुज येणे

कान दुखणे

उपचार

हा एक दुर्मिळ आजार आहे. मात्र तरीही यावर उपचार करणे शक्य आहे. यासाठी सुरुवातीला एमआरआय किंवा सिटी स्कॅन केले जाते. त्यानुसार आजार पाहून त्यावर योग्य तो उपचार केला जातो.

अलका याज्ञिक काय म्हणाल्या?

अलका याज्ञिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर याबाबत माहिती दिलीये. या आजारामुळे त्यांना हेडफोन आणि कॉड, तसेच मोठ्या आवाजातील ध्वनी न ऐकण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.

सध्याच्याची तरुणाई आणि अन्य व्यक्ती देखील अशा हेडफोनचा जास्तीत जास्त वापर करतात. अशा व्यक्तींना देखील हा आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT