Travel Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Plan : काय सांगता! जूनमधल्या पावसात थंडगार बर्फाची मज्जा घ्यायचीय, या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Rainy Season Travel Tips : भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे, परंतु देशाच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Snowfall Places : भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे, परंतु देशाच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. उन्हाळ्यात थंड भागात फिरणे हा एक वेगळाच अनुभव असतो. तुम्हाला जूनमध्ये बर्फ पहायचा आहे का, तर तुम्ही भारतातील या हिल स्टेशन्सचे नियोजन करावे.

भारतातील बहुतांश भागातील लोक उष्णतेमुळे (Heat) हैराण झाले आहेत आणि त्यातून आराम मिळवण्यासाठी अनेक थंड भागात प्रवास करतात. जूनमध्ये बर्फवृष्टी पाहणे विचित्र वाटत असले तरी भारतात अशी काही हिल स्टेशन्स (Stations) आहेत जिथे यावेळीही बर्फ पडतो. त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

हिमाचल प्रदेश -

Himachal Pradesh

भारतात, हिमाचल हिल स्टेशन्सचा गड मानला जातो. हिमाचल (Himachal) सुंदर पर्वतांनी वेढलेले आहे आणि येथील नदीचे नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ मनाला भुरळ घालते. वृत्तानुसार, हिमाचलच्या अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे.

स्पिती व्हॅली -

Spiti Valley

हिमाचलची स्पिती व्हॅली हे एक अप्रतिम ठिकाण आहे. बर्फाने वेढलेल्या या ठिकाणाला बर्फाचे वाळवंट देखील म्हणतात. हिमालय पर्वतरांगांच्या मध्यभागी जाणारे वळणदार रस्ते हे ठिकाण वेगळे करतात. हिमवर्षावाचा आनंद लुटण्यासाठी परदेशी नागरिकही येथे येतात.

मनाली-लेह मार्ग -

Manali Leh Route

हिमाचलचे मनाली हे पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. वृत्तानुसार, मनाली-लेह रस्त्यावर सध्या बर्फवृष्टी होत आहे. हा मार्ग बाइक राइडसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथून दिसणारे दृश्य मन मोहून टाकणारे आहे.

गुलमर्ग, काश्मीर -

Gulmarg Kashmir

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये नैसर्गिक सौंदर्याचे एक अनोखे विश्व आहे. काश्मीरमध्ये थंडी आहे, पण इथे गुलमर्ग हा एक असा भाग आहे जो बर्फाचा प्रदेश मानला जातो. जूनमध्ये बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर गुलमर्गच्या सहलीला जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT