full forms of STD ISD and PCO saam tv
लाईफस्टाईल

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

General Knowledge: फोन करण्याच्या दुकानात STD, ISD आणि PCO असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. मात्र याचा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

ज्यावेळी मोबाईल नव्हता तेव्हा आपण घराखालच्या दुकानात जाऊन फोन करायचो. त्यावेळी घरी लँडलाईन फोन असायचे किंवा दुकानात जाऊ फोन करावा लागायचा. त्यावेळी फोन करण्याच्या दुकानात STD, ISD आणि PCO असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. मात्र याचा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का? त्याचप्रमाणे या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत ते जाणून घेऊया.

ISD म्हणजे काय?

ब्रेनली या जनरल नॉलेजच्या वेबसाइटवर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या हा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर देण्यात आलंय. त्या आधारे आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत. आजच्या काळात आंतरराष्ट्रीय कॉल करणं खूप सोपं आहे. आपण व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप्सद्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. पण जुन्या काळात लोकांना आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी आयएसडी कॉल करावा लागत होता

ISD म्हणजे आंतरराष्ट्रीय सबस्क्राइबर डायलिंग. यावेळी प्रत्येक देशाचा स्वतःचा ISD कोड असतो. भारताचा कोड +91 आहे. तुम्ही कोणत्याही ऑपरेटरशिवाय ISD कॉल करू शकता, तुम्हाला प्रथम त्या देशाचा ISD कोड डायल करावा लागेल आणि नंतर नंबर डायल करावा लागतो.

PCO म्हणजे काय?

पीसीओ हे देखील एक पब्लिक कॉलिंग (Public Call Office) सेवा होती. मात्र आता ती अस्तित्वात नाही कारण प्रत्येकाकडे फोन आहे. PCO चे पूर्ण फॉर्म पब्लिक कॉल ऑफिस असा आहे. पीसीओ कॉईन किंवा मॅन्युअली चालत होते. त्या टेलिफोन बूथला पीसीओ असे म्हणतात.

STD म्हणजे काय?

STD चा फुलफॉर्म Subscriber Trunk Dialing असा आहे. ही कॉलिंग सुविधा देशाच्या वेगवेगळ्या भागात उपस्थित असलेल्या दोन लोकांमध्ये होती. लोकांना दुसऱ्या शहराचा एसटीडी कोड डायल करावा लागायचा आणि थेट कॉल केला जायचा. या दरम्यान कोणत्याही ऑपरेटरची गरज नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

SCROLL FOR NEXT