brain tumor symptoms google
लाईफस्टाईल

Brain Tumor Symptoms: कानातील वेदना की गंभीर आजाराची सुरुवात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Glioblastoma Brain Tumor: तज्ज्ञांच्या मते ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमरवर उपचार करणं फार कठीण आणि जोखमीचं काम असतं. त्यामुळे कानाला कोणत्याही वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Saam Tv

कानाला कोणत्याही वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याचा धोका असू शकतो. कानाला काही दुखापत होत असतील तर हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या लक्षणांमध्ये चक्कर येते, डोळ्यांना त्रास होतो, तसेच बोलताना अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच कानामध्ये इंफेक्शन होतं. पुढे ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता असते.

ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमरवर उपचार काय?

तज्ज्ञांच्या मते ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमरवर उपचार करणं फार कठीण आणि जोखमीचं काम असतं. यासाठी ६ ते ७ आठवडे रेडियोथेरपी केली जाते. मात्र त्याने तुम्हाला विविध साइट इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्याने तुम्हाला अन्न गिळताना सुद्धा त्रास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तसेच बेडवरून उठताना सुद्धा त्रास होऊ शकतो.

ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर हा एक ब्रेन ट्युमरचाच एक प्रकार आहे. या ट्युमरची गाठ मेंदूच्या आतील भागात वाढत जात असते. त्याने मेंदुच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. पुढे हा आज एक गंभीर कॅन्सरचं रूप घेऊ शकतो.

ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती?

डोकेदुखी

कानात वेदना होणे.

उलट्या होणे.

शरीरात कमजोरपणा जाणवणे.

ऐकू न येणे.

जुन्या गोष्टींचा विचार करणे.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार

मेलिग्नेंट ट्यूमर

मेलिग्नेंट ट्यूमर हा एक ब्रेन ट्यूमरचा भाग असतो. यामध्ये कॅन्सरच्या पेशी फार संवेदनशील असतात. या पेशी मेंदूमध्ये वेगाने वाढतात. फक्त मेंदूवरच परिणाम न करता डोक्याच्या इतर भागांवर आणि मणक्यावरही या पेशी पसरतात.

बिनाइन ट्यूमर

मेंदूच्या भागात बिनाइन ट्यूमर हा ट्यूमर नॉन कॅन्सरस असून तो काढूनही टाकता येतो. परंतु हा ट्यूमर पुन्हा होण्याचा धोका असतो. बिनाइन ट्यूमर मेंदूच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. काही रुग्णांमध्ये या ट्यूमरचे रुपांतर मेलिग्नेंट ट्यूमरमध्येही होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वर दर्शनाला

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

Gold Price: सोन्याचा भाव घसरला! महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी खरेदीदारांना दिलासा; वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT