Weight Loss Tips Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : दिवाळीला अवघे ७ दिवस राहिलेत आणि वजन कमी करायचंय? मग या टिप्सने चरबी होईल गायब

Weight Loss in 7 Days : वजन कमी करण्यासाठी व्यक्ती विविध प्रयोग करतात. त्यात आता दिवाळी सण येत असल्याने ७ दिवसांत बारीक व्हायचं असेल तर काय केलं पाहीजे त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दिवाळी म्हणजे सर्वात मोठा सण. दिवळी सणाची प्रत्येक वर्षी वाट पाहिली जाते. अंगणात सुंदर रांगोळी, कंदील आणि सर्वत्र दिव्यांची विद्युत रोषणाई असते. त्यामुळे दिवाळीला प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. दिवाळीत बरेच गोड पदार्थ बनवले जातात. घरोघरी जाऊन फराळ करण्याची मजा काही निराळीच असते. आता त्यासाठी काही व्यक्ती आधीच वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

दिवाळी यंदा २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. २९ तारखेला धनत्रयोदशी आहे. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दिवाळीच्या सणात तुम्हाला सुद्धा सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी वजन कमी करण्याच्या काही खास टिप्स शोधल्या आहेत. चला तर मग आज याच बद्दल जाणून घेऊया.

फूड रिल्स कमी पाहा

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारावर कंट्रोल असलं पाहिजे. आपला फोन किंवा लॅपटॉपमध्ये आपण विविध गोष्टी पाहतो. सोशल मीडियावर आपण जे पाहतो त्याच पद्धतीची माहिती आपल्याला सजेस्ट होत असते. त्यामुळे सतत खाण्यापिण्याचे रिल्स किंवा फोटो पाहू नका. कारण हे रिल्स पाहिल्याने आपल्याला ते पदार्थ खाण्याचे क्रेवींग होते. त्यामुळे फूड रिल्स कमी पाहा.

पालेभाज्यांचे सेवन

तुमचा डाएट प्लान तयार करा. डाएट प्लान तयार झाला की त्यानुसारच आहार घ्या. यात तुम्ही डाएट प्लानमध्ये एक दिवस फळे, एक दिवस पाले भाज्या, एक दिवस कडधान्ये असा प्लान करू शकता. डाएटमध्ये सर्वाधिक पालेभाज्यांचे सेवन केला पाहिजे. पालेभाज्या खाल्ल्याने आपलं आरोग्य निरोगी राहतं. शिवाय शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते.

दालचीनी आणि सफरचंदाचा ज्यूस

वजन कमी करण्यासाठी सर्व फळे फायदेशीर आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे सफरचंद. तुम्ही रोज एक सफरचंद आहारात घेतले पाहिजे. आता तुम्हाला झटपट बारीक व्हायचं असेल तर दालचीनी आणि सफरचंद या दोघांचा ज्यूस करून घ्या. हा ज्यूस तुम्ही रोज सकाळी चहा घेण्याआधी प्यायला पाहिजे. याने देखील पोटावरील चरबी कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT