Early warning signs of blocked arteries in hands saam tv
लाईफस्टाईल

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Early warning signs of blocked arteries in hands: धमन्या ब्लॉक होण्याआधी हातांमध्ये काही लक्षणं दिसू शकतात जसे हातात वेदना होणं, बोटांचा रंग बदलणं किंवा नखांची वाढ मंदावणं. ही लक्षणं वेळेवर ओळखल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Surabhi Jayashree Jagdish

धमन्या ब्लॉक होणं हे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकशी संबंधित असतं. याची लक्षणं वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात. ज्या वेळी या धमन्या अरुंद होतात किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा गंभीर परिस्थिती निर्माण होते. मात्र, यापूर्वी तुमच्या हातांमध्ये काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं वेळीच ओळखल्यास तुमच्या धमन्या ब्लॉक झाल्यात हे तुमच्या लक्षात येण्यास मदत होते. कोणती आहेत ही लक्षणं ते पाहूयात.

एका हातात वेदना होणं

ज्या वेळी एका हातात अचानक तीव्र आणि टोचल्यासारखी वेदना होणं हे धमन्या ब्लॉक झाल्याचे किंवा रक्ताच्या गाठीचे संकेत असू शकतात. ही वेदना तीव्र असून अनेकदा एकाच हातामध्ये जाणवू शकते. ही स्थिती 'क्रिटिकल लिंब इस्केमिया' (Critical Limb Ischemia) नावाच्या गंभीर अवस्थेचं लक्षण असू शकते, ज्यामध्ये त्या भागातील रक्तप्रवाह अचानक थांबतो. यामध्ये अनेकदा हात सुन्न होणं किंवा मुंग्या येणं असा त्रासही जाणवतो.

बोटांचा रंग बदलणं

धमन्या ब्लॉक झाल्यानंतर त्वचेच्या रंगात बदल दिसू शकतो. हा बदल सामान्यपणे बोटांमध्ये दिसून येतो. काही वेळा बोटांचा रंग निळा, पांढरा किंवा जांभळा दिसण्याची शक्यता असते. थंडी किंवा ताण यामुळेही अशी स्थिती उद्भवू शकते. ही स्थिती परिफेरल आर्टरी डिसीजचा एक प्रकार असून तिला Acrocyanosis असं म्हटलं जातं.

हातात गोळे येणं

वैद्यकीय भाषेत याला Claudication असं म्हटलं जातं. ज्या वेळी हात किंवा फोरआर्ममध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात, तेव्हा हे लक्षण दिसून येतं. अ‍ॅथेरोस्क्लेरोसिसमुळे म्हणजेच धमन्यांमध्ये प्लॅक साचल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा मिळत नाही. परिणामी हात जड वाटणं किंवा गोळे येणं अशी समस्या जाणवू शकते.

नखांची वाढ मंदावणं

परिफेरल आर्टरी डिसीजमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे शरीराच्या काही भागांपर्यंत योग्य पोषण पोहोचत नाही. ही स्थिती जास्त प्रमाणात गंभीर झाल्यास औषधोपचारांबरोबरच पेशीचं आरोग्य हळूहळू बिघडू लागतं. अखेरीस याचा परिणाम नखं आणि त्वचेवरही होऊ लागतो. अशा वेळी हातांची नखं हळू वाढतात किंवा ती लगेच तुटू शकतात. अधिक गंभीर अवस्थेत नखांची वाढ पूर्णपणे थांबू शकते.

काय केलं पाहिजे?

अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या सर्व लक्षणांची त्यांना माहिती द्यावी. यासोबतच जीवनशैलीत काही बदल करणंही गरजेचं आहे, जसं की धूम्रपान सोडणं, नियमित व्यायाम करणं आणि संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT