Electric Car
Electric Car Saam TV
लाईफस्टाईल

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात आहात? 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

Shivani Tichkule

Electric Car : जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती ११० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. दर महिन्याला देशात ४ हजारांच्या आसपास इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होत आहे. पेट्रोलचे वाढलेले दर आणि सरकारकडून होणारी जनजागृती, सरकारकडून दिली जाणारी सबसिडी यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करू लागले आहेत.

इलेक्ट्रिक कार (Electric Car) महाग असल्या तरी त्या मेन्टेन करणं कमी खर्चिंक असतं. तसेच पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत वीज खूप स्वस्त आहे. त्याचबरोबर पर्यावरणास देखील हानी पोहोचत नाही. दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत, चार्जिंग आणि रेंजबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, ज्यामुळे ते इलेक्ट्रिक कार घेण्यास कचरतात.

तुम्ही देखील सध्या इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ईव्हीची किंमत, रनिंग कॉस्ट, मेन्टेनन्स कॉस्ट, फेम २ आणि स्टेट सबसिडी, चार्जिंग स्टेशनसह अनेक खास फीचर्सची माहिती घ्यायला हवी. जेणेकरून तुमचं भविष्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही.

चार्जिंग स्टेशन

आपल्या देशात पुरेसं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नाही. सध्या इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी जागोजागी पर्याय उबलब्ध नाही. काही बड्या शहरांमधे मोजके चार्जिंग स्टेशन्स आहेत. मात्र ते देखील पुरेसे नाहीत. प्रवासादरम्यान, कारचं चार्जिंग संपलं तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. छोट्या शहरांमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवल्यास आणि जागोजागी चार्जिंग स्टेशन्स उभारल्यानंतरच या सेगमेंटचा भारतात विस्तार होऊ शकतो. अन्यथा इलेक्ट्रिक वाहनांना मोठा प्रतिसाद मिळणं शक्य नाही. तुमच्या घरापासून चार्जिंग स्टेशन किती अंतरावर आहे, याचा विचार करा.

इलेक्ट्रिक कार का खरेदी करावी?

इलेक्ट्रिक कारने एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तुम्हाला 1.2 ते 1.4 रुपये इतका खर्च येतो. तर पेट्रोलच्या गाडीसाठी प्रतिकिलोमीटर खर्च नऊ रुपये इतका आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक कारने महिन्यात 800 किलोमीटर प्रवास केला तरी 640 रुपये खर्च येईल. याऊलट पेट्रोल-डिझेलच्या वाहनाचा महिन्याचा खर्च 7200 रुपये इतका आहे.

अन्य इलेक्ट्रिक कार कोणत्या?

10 लाखांपेक्षा कमी किंमतीची EV हवी आहे असेल तर तुम्ही Tata Tiago EV आणि Citroen C3 या दोन गाड्यांचा विचार करू शकता. या दोन्ही वाहनांची किंमत जवळपास सारखीच असू शकते.

10 लाखांपेक्षा कमी पेट्रोलवर चालणारी कार हवी असेल तर हॅचबॅक, सब-कॉम्पॅक्ट सेडान, क्रॉसओवर, मायक्रो एसयूव्ही या गाड्यांचा विचार करू शकता

बॅटरीची वॉरंटी

इलेक्ट्रिक कार्सचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यामधील बॅटरी. उत्पादक बहुतांशी बॅटरीवर आठ वर्षांची वॉरंटी देतात. वाहनाच्या एकूण किंमतीपैकी ४० टक्के हिस्सा हा बॅटरीचा असतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी, या कारच्या बॅटरीवर तुम्हाला किती वॉरंटी मिळत आहे ही बाब नक्की तपासायला हवी.

​किंमत खूप महत्त्वाची

इलेक्ट्रिक कारची सध्या मोठ्या प्रमाणात चांगली मागणी आहे, परंतु जेव्हा किंमतीचा विषय येतो तेव्हा ती किती फायदेशीर आहे हे जाणून घेणं तितकाच महत्वाचं असत. कारण या कार्सच्या किंमती खूप जास्त असतात. भारतातल्या इलेक्ट्रिक कार्सच्या किंमती १२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT