Morning Do This Things  Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Do This Things : सकाळी लवकर उठून ही कामे करून पहा, जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल

काही लोक त्यांच्या आयुष्यात अगदी उदासवाणे आणि थकलेले पाहायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Morning Do This Things : काही लोक त्यांच्या आयुष्यात अगदी उदासवाणे आणि थकलेले पाहायला मिळतात. त्यांची अयोग्य जीवनशैलनुसार त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती अजिबात नसते. त्यामुळेच अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात काही बदल करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर अशी माणसे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात सकाळी उठल्याबरोबर पुढील गोष्टींचं पालन केलं तर त्यांच्या आयुष्यात बहार येईल.

संपूर्ण दिवस सकारात्मकतेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुमचं आरोग्य आणि मूड या दोन्हीही गोष्टी चांगल्या राहतील. या सायकॉलॉजीकल टिप्स तुमचं आयुष्य सुधारण्यास मदत करतील.

तुम्हाला चांगल लाईफस्टाईल (Lifestyle) हवं असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या दिवसाचं प्लॅनिंग करायला हवं. यासाठी तुम्ही रात्रीच दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीची योजना आखली पाहिजे. जेणेकरून ठरवल्याप्रमाणे तुम्ही तुमचा दिवस आनंदी आणि समाधानी घालवू शकता. त्याचबरोबर असं केल्याने तुम्हाला स्वतः मध्ये अनेक बदल जाणवतील आणि तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारेल.

अशातच तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर नियमीत व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सकाळी उठल्याबरोबर व्यायाम केल्याने तुमच्या शरीरामध्ये एंडोफ्रीन नावाचा हार्मोन ट्रिगर होतो. ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस स्वताला आनंदी पाहु शकता.

दिवसभरातील जे काही काम असेल ते उरकून घेत चला. तुम्ही ऑफिस वर्क किंवा इतर कोणतेही काम करत असाल आणि त्यामध्ये एखादे कठीण काम असेल तर तुम्ही आधी कठीण काम आटपून घेतल पाहिजे. असं केल्याने तुमचं काम फटाफट संपेल आणि तुम्हाला लवकर काम केल्याचं समाधान मिळेल.

त्याचबोबरीने तुम्ही तुमच्या आहारात हेल्दी डायटचा समावेश केला पाहिजे. तुमच्या चुकीच्या आहारमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ शकतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून काही तास स्वताला द्यायचे. दिवसभरातील कामामुळे आपण स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो. त्यामुळे रोज दिवसातील 2 तास काढून स्वतःला द्यायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut: मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे उखाडा - संजय राऊत |VIDEO

Maharashtra Live News Update : बीडमधील लिफ्ट अपघातावर मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्याच्या प्रतिक्रिया

Raksha Bandhan Special : बहिणींनो भावांसाठी प्लान करा सरप्राइज ट्रिप, कर्जतजवळ आहे भन्नाट पिकनिक स्पॉट

Beed News: पुन्हा मैदानात या बजरंग सोनवणेंच्या मैत्रीदिनानिमित्त धनंजय मुंडेंना शुभेच्छा|VIDEO

SCROLL FOR NEXT