Vodafone-Idea Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Vodafone-Idea Recharge: युजर्ससाठी धमाकेदार ऑफर्स! अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 5GB डेटा आणि बरंच काही...

Vodafone-Idea New Recharge : नुकतेच व्होडाफोनने ग्राहकांसाठी ४ नवीन प्लान आणले आहेत. ज्यामध्ये युजर्सला 5GB डेटा फ्रीमध्ये मिळेल.

कोमल दामुद्रे

Vodafone-Idea New Recharge Plan [Updated]:

व्होडाफोन-आयडीया ही देशातील सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. जिओ-एअरटेलच्या युजर्सनंतर व्होडाफोन - आयडियाचे युजर्स सर्वाधिक आहेत. अशातच ही टेलिकॉम कंपनी ग्राहकांना चांगली आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी नवीन योजना आणत असते.

जर तुम्ही देखील व्होडाफोन-आयडियाचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच व्होडाफोनने ग्राहकांसाठी ४ नवीन प्लान आणले आहेत. ज्यामध्ये युजर्सला 5GB डेटा फ्रीमध्ये मिळेल. तसेच प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सोबत वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते.

1. VI चा 666 रुपयांचा प्लान

व्होडाफोन (Vodafone)-आयडियाचा हा रिचार्ज प्लान ५६ दिवसांसाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सना दिवसाला 3GB डेटा मिळेल. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्सना 5GB डेटाही फ्री मिळेल. वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा देखील यात मिळणार आहे.

2. VI चा 699 रुपयांचा प्लान

व्होडाफोन-आयडियाचा हा प्लान ७७ दिवसांसाठी आहे. या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड (Unlimited) कॉलिंग, १०० एसएमएस आणि दिवसाला 1.5 GB डेटा मिळेल. तसेच यामध्ये युजर्सना ३ दिवसांसाठी 5GB डेटा देखील मिळणार आहे. यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर देखील मिळत आहे.

3. VI चा 719 रुपयांचा प्लान

हा प्लान तुम्हाला ७७ दिवसांसाठी मिळत आहे. या प्लानमध्ये युजर्सना दिवसाला 1.5GB डेटा, फ्री व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच कंपनीकडून ३ दिवस 5GB डेटा (Data) मिळणार आहे. यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा फ्रीमध्ये मिळेल.

4. VI चा 839 रुपयांचा प्लान

या प्लानची व्हॅलिडीटी ८४ दिवसांची आहे. कंपनी आपल्या युजर्सना यामध्ये दिवसाला 2GB डेटा ऑफर करते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा मिळत आहे. तसेच यामध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT