Vodafone Idea Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Vodafone Idea Recharge Plan : ६ महिने रिचार्जचे टेन्शन नाही! VI चा जबरदस्त प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतोय डेटा फ्री

Vodafone Idea New Recharge: VI ने आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच दोन नवीन रिचार्ज प्लान आणले आहेत.

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Recharge Dhamka :

भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांना रिचार्जचा विविध सेवा पुरवतात. अशातच VI ने आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच दोन नवीन रिचार्ज प्लान आणले आहेत.

कंपनी ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज प्लान लॉन्च करत असते. अशातच VI ने अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस प्लान लॉन्च केला आहे. VI चा हा रिचार्ज हजार रुपयांच्या आत प्रीपेड प्लान म्हणून कंपनीने आणला आहे. तसेच हा प्लान १८० दिवसांसाठी असणार आहे. त्यासोबत १२ जीबी डेटा फ्री मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. VI चा ९४९ रिचार्ज

VI हा ९४९ रुपयांचा हा प्लान १८० दिवसांसाठी मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला १२ जीबी डेटा मिळेल. याचा अर्थ सहा महिन्यांसाठी तुम्हाला १२ जीबी मिळेल. यासाठी तुम्हाला टॉपअप रिचार्ज करु शकता. VI च्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिगसह (Calls) दिवसाला १०० फ्री एसएमएस मिळतील.

2. कोणत्या ग्राहकांना मिळेल लाभ

ज्या ग्राहकांचे ड्युल सिम असून ज्यांना ते अॅक्टिव्ह ठेवायचे आहे. त्यांच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीचा डेटा मिळेल.

3. VI चा ५४९ रिचार्ज

VI चा हा प्लान देखील १८० दिवसांसाठी (Days) असणार आहे. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळतो. अतिरिक्त डेटासाठी तुम्हाला दैनिक मर्यादेनंतर डेटा हवा असल्यास तुम्ही टॉप अप रिचार्ज करु शकता. यामध्ये तुम्हाला लोकल आणि एसटीडी कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंदाला आकारला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT