Vitamin A, Eye Care Food Saam Tv
लाईफस्टाईल

Vitamin A च्या कमतरतेमुळे होऊ शकतो डोळ्यांवर परिणाम, हे पदार्थ जरुर खा

Eye Care Food : हल्ली कमी वयात डोळ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांचा वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना डोळ्यांचा त्रास अधिक होतो. त्यासाठी मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करायला हवा.

कोमल दामुद्रे

Eye Care Tips :

आरोग्यासाठी अनेक जीवनसत्त्व, प्रथिने अधिक आवश्यक असतात. त्यातील एक व्हिटॅमिन -ए. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. डोळ्यांसोबतच हृदय, त्वचा, फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे.

आहारात याच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होणे, प्रजननक्षमतेशी समस्या, कमकुवत प्रतिकारशक्ती, त्वचेशी (Skin) संबंधित समस्या आणि श्वसन संक्रमाणाचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन (Vitamin) ए असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

हल्ली कमी वयात डोळ्याच्या (Eye) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांचा वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना डोळ्यांचा त्रास अधिक होतो. त्यासाठी मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करायला हवा.

1. गाजर

गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर देखील आढळतात. जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए समृद्ध असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत करते. पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर असतात.

2. रताळे

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते. याव्यतिरिक्त हे प्रथिने, फायबर आणि इतर पोषक तत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

3. पालक

पालक देखील व्हिटॅमिन ए चा चांगला स्त्रोत आहे. जो शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

4. आंबा

आंब्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर आढळते. आंब्यामध्ये व्हिटॅमन ए अधिक प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

5. पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन ए चा चांगला स्त्रोत आहे. जो शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट बालुशाही, वाचा सोपी रेसिपी

Mojtaba Khamenei : युद्धातून सर्वात मोठी बातमी, इराणच्या मोजतबा खामेनींवर तब्बल ८३ कोटींचं बक्षीस

Nashik Tourism : नाशिकमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, 'या' ऐतिहासिक ठिकाणाहून दिसेल पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT