Viral Teacher
Viral Teacher  Saam Tv
लाईफस्टाईल

Viral Video : भारतीय शिक्षकाची परदेशी विद्यार्थांना भुरळ, शिकवण्याची हटके स्टाईल चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : कराळे मास्तर, डिसले गुरुजी, खान सर यांची विद्यार्थ्यांना (Student) शिकवण्याची धडपड तुम्ही पाहिलीच असेल. त्यांच्याविषयीची माहिती वेळोवेळी समोर येत असते. त्यांची शिकवण्याची पद्धत हटकी असल्याने ती विद्यार्थ्यांना भावते आणि हे शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनले आहे. अशाच एका भारतीय शिक्षकाने अमेरिकेतील विद्यार्थ्यांना भुरळ घातली आहे. एक व्हिडीओ व्हायरल (Viral VIdeo) होत आहे, ज्यामध्ये एक भारतीय शिक्षक अमेरिकेतील मुलांना गणित शिकवत आहे.

इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे. जिथे एका भारतीय शिक्षकाने मुलांना गणित शिकवण्यासाठी अनोखी पद्धती आजमावली आहे. याआधी क्वचितच तुम्ही मुलांना अशा संगीतमय पद्धतीने अभ्यास करताना विद्यार्थ्यांना पाहिले असेल. काही मुलांना गणिताचं नाव ऐकलं तरी डोकं चक्रावतं. गणित हा विषय समजला नाही तर अवघड होऊन जातो. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की एक शिक्षक संगीतमय पद्धतीने मुलांना गणित शिकवताना दिसत आहे. (Latest News Update)

एक भारतीय शिक्षक काही परदेशी विद्यार्थ्यांना भूमितीच्या महत्त्वाच्या काही सूत्रांची उजळणी घेत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने सूत्र पाठ करुन घेत आहे. जे पाहून सगळेच चकित झाले आहेत. या दरम्यान विद्यार्थी डेस्कवर थम्पिंग करून संगीत देत आहेत आणि शिक्षक नृत्य, गाणे आणि संगीत पद्धतीचा अवलंब करून त्यांना सूत्रे समजावून सांगत आहेत.

ट्विटरवर @AK_Inspire नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT