Vegetable Oats Recipe  saam tv
लाईफस्टाईल

शरीरातील वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करायचंय? 'या' पद्धतीने हेल्दी ओट्स बनवल्यास दिसेल फरक

शरीरातील अतिरिक्त कॉलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे अनेक आजारांना सामना करावा लागू शकतो.

Vishal Gangurde

Vegetable Oats Recipe : शरीरात अधिक प्रमाणात कॉलेस्ट्रॉल असणं हा धोक्याचा इशारा आहे. तेलकट पदार्थ, व्यायाम न करणे, लठ्ठपणा, सिगारेट ओढणे आणि दारू पिण्याच्या व्यसनांच्या कारणामुळे कॉलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढते. शरीरातील अतिरिक्त कॉलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे अनेक आजारांना सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाढत्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण करणे गरजेचे आहे.

खराब कॉलेस्ट्रॉलमुळे पोटावर चरबी वाढते. त्वचा काळसर होण्यास सुरुवात होते. श्वास घेण्यास अनेकांना अडचणी येतात. कॉलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात वाढल्यास अनेक गंभीर आजार होतात. स्ट्रोक आणि हृदय विकाराचा आजार होण्याचा धोका देखील संभवतो. सदर आजार टाळण्यासाठी पालेभाज्या (Vegatable) आणि ओट्सचे खाणे सुरू केल्यास आरोग्य (Health) फायदेशीर ठरेल. जाणून घ्या स्वादिष्ट ओट्स बनवण्याची पद्धत.

ओट्ससाठी लागणारे साहित्य

१) एक कप ओट्स

२) एक कापलेला कांदा

३) एक कापलेला टोमॅटो

४) चार-पाच बीन्स

५) एक कापलेली शिमला मिरची

६) चिमुटभर लाल तिखट, काळी मिरी, ओरिगेनो, हळद, रायी

७) सात-आठ कढीपत्ता

८) मीठ चवीनुसार,

९) थोडा चाट मसाला

१०) एक चमचा ऑलिव्ह तेल

ओट्स कसे बनवायचे ?

1) एका तव्यावर ऑलिव्ह तेल गरम करावे.

2) गरम तेलात रायी, जीरे आणि कढीपत्ता

3) कांदा कापल्यानंतर तव्यावर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात कापलेला टोमॅटो टाकावा.

4) त्यानंतर उरलेल्या भाज्या टाकाव्यात. तसेच त्यात हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्या.

5) त्यात ओट्स टाकावे. त्यालाही थोडे तळून घ्यावे.

6) आता त्यात मीठ आणि थोडे पाणी मिक्स करा. गॅस कमी करून त्याला काही वेळ शिजून द्यावे.

7) पाच ते सहा मिनिट शिजवल्यानंतर तुमचं पालेभाज्याचे ओट्स तयार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT