Vastu Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरातील दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडे, लक्ष्मी देवी होईल नाराज; मिळतील अशुभ फले

Vastu Tips For Plant : चुकीच्या पद्धतीने झाडे लावल्याने घरात सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता वाढू लागते. त्यामुळे घरामध्ये अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. वास्तूशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक वस्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

असे म्हटले जाते की, घरामध्ये झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच घरातील वातावरणही शुद्ध राहाते. वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींना घराच्या सुख-समृद्धीचे कारक मानले जाते. चुकीच्या पद्धतीने झाडे लावल्याने घरात सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता वाढू लागते. त्यामुळे घरामध्ये अनेकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यासाठी घरामध्ये झाडे लावताना ते कोणत्या दिशेला असायला हवे. वास्तूचे नियम काय जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. तुळशीचे रोप

वास्तुनुसार (Vastu Tips) घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नये. यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक (Money) समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच व्यवसायात आर्थिक नुकसान होते. तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे.

2. मनी प्लांट

वास्तूनुसार मनी प्लांट घराच्या (Home) दक्षिण दिशेला मनी प्लांट लावू नये. याचा परिणाम व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर होतो. मनी प्लांट आग्नेय दिशेला लावू शकता. या दिशेला मनी प्लांट लावल्याने पैशांचे अनेक नवे मार्ग खुले होतात.

3. शमीचे झाड

शमीचे रोप हे दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जात नाही. यामुळे वास्तूदोष वाढतात. त्यासाठी शमीचे झाड नेहमी पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावे. असे म्हटले जाते की, यामध्ये विष्णू देवाचा वास असतो.

4. केळीचे झाड

वास्तूनुसार घराच्या दक्षिण दिशेला केळीचे झाड लावणे टाळावे. हे रोप घराच्या आतमध्ये देखील लावू नये. हे रोप नेहमी घराबाहेर उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे फायदेशीर मानले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:परळीच्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Mumbai Rain: मुंबईसाठी पुढचे ३ तास महत्वाचे, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

Pune - Raigad Fort : पुणे-रायगड सीमेवरील ऐतिहासिक ठिकाण, रायगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला 'हा' किल्ला पाहिलात का?

Bathroom vs washroom: बाथरूम आणि वॉशरूममध्ये नेमका फरक काय असतो?

SCROLL FOR NEXT