Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरातील मंदिर बांधताना हे नियम लक्षात ठेवाच! कधीच येणार पैशांची अडचणी, नांदेल राहिल सुख-समृद्धी

Vastu Tips For Home : वास्तूशास्त्रानुसार घरातील सगळ्यात पवित्र जागा ही मंदिर मानली जाते. त्यामुळे घरात मंदिर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Temple :

वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक घरात मंदिर असते. ज्याची आपण नियमितपणे पूजा करतो. परंतु, वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो.

वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरातील सगळ्यात पवित्र जागा ही मंदिर मानली जाते. त्यामुळे घरात मंदिर बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. त्यांचा अवलंब न केल्यास घरात नकारात्मकता येते. त्यामुळे घरातील मंदिरांशी संबंधित काही वास्तु नियमांचे (Rules) पालन करणे गरजेचे आहे.

1. मंदिर बांधताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये मंदिर (Temple) बनवताना त्याच्या दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घराचे मंदिर नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला बनवा. या दिशेला मंदिर बांधणे अधिक शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

  • वास्तूशास्त्रानुसार दिशा तसेच मंदिराचे स्थान लक्षात ठेवा. शौचालयासमोर, पायऱ्यांखाली किंवा मेन गेट समोर कधीही मंदिर बांधू नका. हे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांचे नुकसान होते.

  • वास्तूशास्त्रानुसार मंदिराची पूजा करताना तुमचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे. पूर्वेकडे तोंड करुन पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील सदस्यांची प्रगती होते असे म्हटले जाते.

  • पश्चिमेकडे तोंड करुन पूजा केल्याने संपत्ती वाढते. पूजा करताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करुन बसू नका.

  • मंदिरात पूजा करताना दिवा दक्षिण दिशेला लावू नका. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT