Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : चुकूनही या 4 गोष्टी फुकटात घेऊ नका, सतत करावा लागेल गरीबीचा सामना

Vastu Rules : घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रात अनेक नियमही आहेत.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला अधिक महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रात अनेक नियमही आहेत.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहे. ज्याचे पालन केल्यास धनलाभ तर होतोच तसेच जीवनही आनंददायी होते. परंतु, आपल्या घरात कोणतीही वस्तू आणण्यापूर्वी ती कोणाकडूनही फुकटात घेऊ नये कारण त्यामुळे गरीबीचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1.मीठ

वास्तूशास्त्रात मिठाचा संबंध हा शनिशी आहे. मीठ कधीही फुकट घेऊ नये. त्यामुळे कर्जाचा (Loan) बोझा वाढतो असे मानले जाते. दुसऱ्याकडून मीठ घेऊन त्याचा वापर केल्याने व्यक्ती आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा.

2. रुमाल

बरेचदा आपण इतरांचे रुमाल वापरतो. फुकटात घेतलेला रुमाल वापरल्याने भांडण होऊ शकते. तसेच ज्या व्यक्तीकडून फुकटात रुमाल घेतला आहे त्या व्यक्तीसोबत भविष्यात तुमचे नाते बिघडू शकते. तसेच कुटुंबामध्ये (Family) कलह देखील वाढतो.

3. लोखंड

लोहाचा संबंध हा शनिसोबत येतो. लोखंड किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू कोणाकडून फ्रीमध्ये घेऊ नका. यामुळे घरात दारिद्रयाचा सामना करावा लागेल. लोहाने गरीबी, अडथळे आणि तणावाचा सामना करावा लागतो. लोखंडाचा फुकट वापर केल्याने आरोग्य (Health) बिघडतो.

4. सुई

सुई कधीही फुकटात कोणाकडून घेऊ नका. यामुळे नातेसंबंध बिघडतात. तसेच वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंधावर वाईट परिणाम होतो. आर्थिक नुकसानही होते. वास्तुशास्त्रानुसार फुकटात घेतलेली सुई जीवनात नकारात्मकता आणते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

Sameer Choughule: 'दादरलाच आहात मग घरी या...'; समीर चौघुलेने घेतली राज ठाकरेंची खास भेट, सांगितला तो किस्सा

Raw Mango Pickle Recipe: कैरीच्या लोणच्याचे ५ चविष्ट प्रकार

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT