Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरात होतायत सतत भांडणं, कटकटीपासून वैतागले आहात? हे वास्तू उपाय फॉलो करा, नांदेल सुख- शांती

Vastu Tips For Positive Energy : वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तूदोषाचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी असतात. ज्याचा आपल्यावर परिणाम होतो. आपल्या काही चुकांमुळे आपल्याला वास्तूदोषाचा सामना करावा लागतो.

घरात वास्तूदोष निर्माण झाल्यावर सतत भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सतत आजारी पडते. वास्तूचे काही उपाय केल्याने घरात-सुख समृद्धी नांदते. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. घरात वास्तूदोष निर्माण झाल्यावर कौटुंबिक वाद होतात. मन अशांत राहाते. यासाठी वास्तूदोषात काही उपाय दिले आहेत जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. घराचे मुख्य प्रवेशद्वार

घराला (Home) नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता राखा. दरवाजावर कोणतीही गोष्ट पसरलेली नसावी. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. यामुळे कौटुंबिक वाद संपतील.

2. लिव्हिंग रुम

लिव्हिंग रुममध्ये फर्निचर अशाप्रकारे ठेवा की, लोकांना समोर बसून बोलता येईल. घराच्या कोपऱ्यात फर्निचर ठेवू नका. यामुळे नकारात्मकता येते. घरात कलह निर्माण होतो.

3. स्वयंपाकघर

घराचे स्वयंपाकघर (Kitchen) आग्नेय दिशेला असायला हवे. स्वयंपाकघरातील भिंतीचा रंग हलका असावा. यामुळे घरात सुख-शांती कायम राहाते.

4. बेडरुम

बेडरुममध्ये बेडच्या दोन्ही बाजूला पुरेशी जागा असावी. वास्तूनुसार दक्षिण-पश्चिम दिशेला बेडरुम असल्यास वैवाहिक (Marriage) जीवनात स्थिरता येते. तसेच नात्यात प्रेम आणि गोडवा कायम राहतो. पती-पत्नीमध्ये मतभेद कमी होतात.

5. घराच्या भिंतींचे रंग

घरातील वास्तूचे लोकांशी भावनिक नाते जोडले जाते. त्यासाठी घराची भिंती रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी. हलका निळा, हिरवा किंवा पेस्टल रंगामुळे घराची सकारात्मकता टिकून राहाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

Santosh Deshmukh Case : मला आरोप मान्य नाही, कराड बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

SCROLL FOR NEXT