Zodiac Signs Love Life. freepik
लाईफस्टाईल

Valentine's Day 2025: 'या' राशींसाठी व्हॅलेंटाइन डे होणार खास, लव्ह लाइफमध्ये होईल खऱ्या प्रेमाची एन्ट्री, मिळेल जोडीदाराची साथ

Valentine's Day Special Love Horoscope For These Zodiac Signs: जर तुम्ही सिंगल आहात तर या व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. या पाच राशींसाठी हा व्हॅलेंटाइन डे खास राहणार आहे. यात तुमची रास आहे का, वाचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॅलेंटाइन वीकची (Valentine's Day) सुरुवात झालेली आहे. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो. या दिवशी लोक आपले प्रेम व्यक्त करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देखील देतात. मग ती फुले असो, कार्ड असो की रोमँटिक डिनर डेट. ज्योतिषींच्या मते, व्हॅलेंटाईन डे या ५ राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या राशींच्या लोकांना फक्त खरं प्रेमचं मिळणार नाही तर यासोबतच जीवनात सच्चा जोडीदाराची साथ लाभू शकते.

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप खास असणार आहे. कारण ते त्यांच्या प्रेमासमोर त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात.मेष राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान असू शकतात. या राशीच्या लोकांना व्हॅलेंटाईन डे ला खरे प्रेम मिळू शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या मित्र किंवा मैत्रीणीला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही व्हॅलेंटाईन डे वर करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तुम्हाला जोडीदाराची संमती मिळेल. तुम्ही सुंदर भेटवस्तू देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे खूप चांगला जाणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेम वाढेल आणि तुम्हाला या दिवशी अनोख्या भेटवस्तू देखील मिळतील.या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळते. बऱ्याचदा मिथुन राशीचे लोक त्यांचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात. या व्हॅलेंटाईनला तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचा जोडीदार त्याचे प्रेम व्यक्त करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेमाची पुढाकार घ्यायची असेल तर तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला प्रपोज देखील करू शकता.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांना या व्हॅलेंटाईन डेला त्यांच्या जीवनसाथीचे प्रेम मिळू शकते. या राशीच्या जीवनात लोकांना खरे प्रेम मिळते. जर ते एखाद्याच्या प्रेमात पडले तर सिंह राशीचे लोक त्यांचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात. या व्हॅलेंटाइन डेला अनेकांना त्यांचे हरवलेले प्रेम सापडू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटसाठी एखाद्या हिल स्टेशनवर जाऊ शकता.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठीही व्हॅलेंटाईन डे खास असणार आहे. नातेसंबंध गोड होतील. तुम्ही रोमँटिक डेटवर सुंदर क्षण घालवाल. तुमच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता राहणार नाही आणि तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काही सरप्राइज गिफ्ट्स देखील मिळू शकते. या दिवशी तुमचा जोडीदार तुम्हाला त्याच्या मनातील भावना शेअर करु शकतो.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशींच्या लोकांना या व्हॅलेंटाइन डेला खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासह खूप छान वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा जोडीदार तुम्ही पुढाकार घेण्याची वाट पाहत आहे. जोडीदाराला एखादी सुंदर भेटवस्तू द्या. खऱ्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या लोकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT