Upcoming Electric Car by Tata  Saam Tv
लाईफस्टाईल

Tata Electric Cars : टाटा घेऊन येतेय तीन जबरदस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण यादी

Tata's Upcoming Electric Car: Tata घेऊन येतेय तीन जबरदस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण यादी

Satish Kengar

Tata Upcoming Electric Car:

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स भारतीय ऑटोमोबाईल बाजारात 3 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये टाटा पंच EV, Curvv EV आणि Harrier EV यांचा समावेश आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Tata Punch EV

लवकरच इलेक्ट्रिक Tata Punch येणार आहे. याच्या समोरच्या फेंडरवर चार्जिंग पोर्ट असणार आहे. याशिवाय टाटा पंच EV ला नवीन स्टीयरिंग व्हील, कॅपेसिटिव्ह HVAC कंट्रोल्स आणि मोठ्या टचस्क्रीनसह अॅडव्हान्स इंटीरियर दिले जाईल. यात दोन बॅटरी पॅक मिळू शकतो.

Tata Curvv EV

Tata Curvv EV ची पुढील वर्षी विक्री सुरु होऊ शकते, असं बोललं जात आहे. ही कार ट्विन इलेक्ट्रिक मोटर सेटअपसह सुसज्ज असू शकते. जी ऑल-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आणि एका चार्जवर सुमारे 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. (Latest Marathi News)

या वर्षाच्या सुरुवातीला 2023 ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केलेल्या या कारवर वक्र कॉन्सेप्ट डिझाइनचा प्रभाव दिसतो. यात 360-डिग्री कॅमेरा, एक मोठा टचस्क्रीन आणि डिजिटल क्लस्टर, ड्युअल पेन सनरूफ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Tata Harrier EV

टाटा ने 2023 ऑटो एक्सपोमध्ये हॅरियर ईव्ही कॉन्सेप्ट कार सादर केली होती. यात 4×4 क्षमता असल्याचे सांगितले जाते. हॅरियर ईव्ही 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा जास्त असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT