Type 2 Diabetes Health google
लाईफस्टाईल

Type 2 Diabetes: हार्ट अटॅक टाळण्यासाठी टाइप २ डायबेटीजच्या रुग्णांनी टाळा या ४ सवयी, राहा हेल्दी अन् फीट

Heart Attack Prevention: टाइप 2 डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी जीवनशैलीत योग्य बदल केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीत खूप बदल करावे लागतात. नाहीतर तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅकच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात टाइप 2 डायबेटीज असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो, असा इशारा तज्ज्ञ देतात.

एव्हरीडे हेल्थच्या अहवालानुसार, अमेरिकेतल्या ३० ते ६० वर्षांच्या मृत्यूचं प्रमुख कारण हृदयविकार आहे. जवळपास 7 लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे झाला आहे. त्यामुळे डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी फॉलो करणं अत्यावश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवणं ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची सवय आहे. जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्त ताण येतो. त्यामुळे शक्यतो कमी मीठ असलेले पदार्थ, संपूर्ण गव्हाची भाकरी किंवा ब्रेड, ब्राऊन राईस यांचा आहारात समावेश करावा. तसेच ॲव्होकॅडो, मासे, नट बटर, टोफू यांसारख्या हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ हृदयासाठी फायदेशीर ठरतात.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणंही तितकेच गरजेचे आहे. वाढलेलं वजन हृदयावर ताण टाकतं. प्रौढांनी आठवड्याला किमान 150 मिनिटं मध्यम तीव्रतेचा किंवा 75 मिनिटे तीव्र व्यायाम करावा. दररोज चालणं, योगा, झुम्बा, जिम यांसारख्या सवयी लावल्या पाहिजेत. यासोबतच नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदाब, रक्तातली साखर, कोलेस्टेरॉल आणि वजन यावर सातत्याने लक्ष ठेवल्याने हृदयाच्या आरोग्याबाबत वेळेवर माहिती मिळते. ओळखीचे डॉक्टर निवडणेही तितकेच आवश्यक आहे, कारण दुर्लक्ष केल्यास कमी वयातच स्ट्रोक, हृदयविकार किंवा दृष्टी कमी होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात.

टीप: हा लेख केवळ माहितीपुरता असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही शंका किंवा आजार असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT