Control High Blood Pressure  Saam Tv
लाईफस्टाईल

Control High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या 7 घरगुती उपायांचा अवलंब करून पहा...

लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Control High Blood Pressure : लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदया संबधित आजार खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. हाय ब्लड प्रेशर मुळे बराच वेळा हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर कसा कराल ते पाहूयात.

मेथी -

मेथी आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवायचे असेल तर मेथी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे सकाळी एक चमचा मेथी पावडर आणि रात्री १ चमचा मेथी पावडर घेतल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रित राहील. मेथी मधुमेहासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. तुम्ही जर याचे पंधरा दिवस सेवन केले तर तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल.

कांदे -

फायब्रिनोलाइटिकचे प्रमाण कांद्यामध्ये असते जे रक्त (Blood) गोठण्यापासून संरक्षण करतो.जर तुम्ही मधात कांद्याचा रस समान प्रमाणात मिक्स करून घेतल्याने तुमची उच्च रक्तदाबाची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होईल.

तुळशी -

तुळशीमध्ये खूप गुणधर्म असतात जे औषधासारखे काम करतात. तुमचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा तुळशी करू शकते. त्यासाठी तुम्हाला तुळस आणि कडुलिंबाचे पाने समप्रमाणात बारीक करून घ्या आणि कोमट पाण्यासोबत सेवन करा.असे आठवड्यातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रित राहील.

मध -

एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून घेऊ शकता. जर तुम्हाला मधुमेहाच्या समस्या असतील तर हा उपाय करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दालचिनी -

स्वयंपाकघरात आपण दालचिनीचा वापर करतो त्यामुळे सहज उपलब्ध होते दालचिनी मध्ये अनेक गुणधर्म असतात जे दात दुखी,कर्करोग,ताप कमी करण्यासाठी मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दालचीनीचा उपयोग केला जातो.

चणे -

हरभरा, गहू दोन्ही समप्रमाणात बारीक पीठ करून त्या पिठाची भाकर सकाळी न्याहारीत रोज खावी. यामुळे तुमचे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होते सोबतच तुम्हाला मधुमेहापासूनआराम मिळेल.

टरबूजाच्या बिया -

जेवणानंतर रोज पाच ते दहा ग्रॅम टरबुजाच्या बिया खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते.टरबुजाच्या बिया मध्ये लायकोपिन कोलेस्ट्रॉल असते कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT