Tourism Lohagad Fort Saam TV
लाईफस्टाईल

Tourism Lohagad Fort : भय, साहस आणि सुंदरता एकाचवेळी तीन अनुभवांसाठी खास लोहगड; कसं जायचं?

Aarti Ingle

पावसाळ्यात अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. अशातच तुम्हीही वीकेंडला फिरायला जायचा विचार करत असाल तर मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या निसर्ग आणि इतिहासाचा संगम असलेल्या लोहगडावर अवश्य भेट द्या.

3 हजार 400 फूट उंचीवरील लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात वसलेला आहे. लोहगड हा किल्ला इंद्रायणी आणि पावनखोरे अशा दोन भागांमध्ये विस्तारलेला आहे. हा किल्ला विसापूर किल्ल्याला जोडण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यटक या गडाकडे खूप आकर्षिक होतात. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.

लोहगड सुमारे 700 वर्षांपूर्वी सुरजमल या राजाद्वारे बांधण्यात आलेला आहे. लोहगडाला अनेक राजवंशांनी वेगवेगळ्या कालखंडात ताब्यात घेतल्याचा मोठा इतिहास आहे. मात्र स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विसापूर किल्ल्यासह लोहगड जिंकून ताब्यात घेतला. लोहगडाचा वापर सुरतेकडून जिंकलेल्या वस्तू ठेवण्यासाठी केला जात असे. पेशवेकाळात या किल्ल्याचा उपयोग काही काळ राहण्यासाठी केला गेला, असा इतिहास आहे.

1) लोहगडावरील चार दरवाजे

गणेश दरवाजा : या दरवाज्याच्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्याच वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती, असे म्हणतात.

नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला होता. येथे एक भुयार आहे, जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येत होती. या दरवाजावर व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत.

हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. या दरवाज्यावर शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो.

2) लोहगडावर पाहण्यासारखी ठिकाणे

किल्ल्यावर महादरवाजाच्या आतमध्ये एक दर्गा आहे. या दर्ग्यापासून पुढे गेल्यावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. किल्ल्यावर लक्ष्मी कोटी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे सुरतेकडून जिंकलेल्या वस्तू ठेवण्यात येत होत्या. गडावर अगदी टोकावर एक कडा आहे त्याचा आकार विंचवासारखा आहे. म्हणूनच या कड्याला विंचू कडा असे म्हटले जाते. या किल्ल्यावर एक प्राचीन गुहा देखील आहे. या गुहेमध्ये तब्बल 80 ते 100 लोक एकाच वेळी बसू शकतात. किल्ल्यावर एक तलाव बनवण्यात आला होता. त्याला सोळा कोणी तलाव असे म्हटले जाते. या तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे.

3) लोहगडाचा जायचे कसे?

मुंबई किंवा पुण्याहून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली रेल्वे स्थानकावर उतरा. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे या गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. जवळपास दीड तास चालल्यानंतर गायमुख खिंड येईल. तेथून तुमचा ट्रेक सुरू होईल. मळवली रेल्वे स्थानकावरून तुम्हाला लोहगडाजवळ पोहोचण्यासाठी शेअरिंग रिक्षाची सुविधाही आहे. यासाठी प्रत्येकी ५० ते ६० रुपये खर्च होईल. लोहगड हा किल्ला पर्यटकांसाठी सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंतच खुला असतो. त्यामुळे निघण्यापूर्वी वेळेचे काटेकोर नियोजन करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT