Offbeat Travel google
लाईफस्टाईल

Hidden Hill Stations: महाराष्ट्रातली ही 7 प्रसिद्ध हिल स्टेशन ९०% लोकांना अजूनही माहित नाहीत

Offbeat Travel: भारतातील ही ७ हिडन हिल स्टेशन शांतता, निसर्गसौंदर्य आणि गर्दीपासून दूर सुट्टी घालवण्यासाठी परफेक्ट ठिकाणं आहेत. अजूनही बहुतेकांना माहीत नसलेली ही ठिकाणं एकदा जरूर पाहा.

Sakshi Sunil Jadhav

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक राज्यात वेगळ्या हवामानाचे, संस्कृतीचे आणि निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते. पण काही ठिकाणं अशी आहेत जी अजूनही सर्वसामान्यांच्या नजरेपासून लपलेली किंवा त्यांना ती माहितही नाहीत. ही हिल स्टेशनं शांत, गर्दीपासून लांब आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेली आहेत. चला, अशाच ७ सुंदर पण Hidden हिल स्टेशनाविषयी जाणून घेऊया.

तमिळनाडूतील वट्टाकनाल हे कोडाईकनालच्या जवळ असलेले छोटेसे पण अत्यंत मोहक हिल स्टेशन आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले हे ठिकाण शांततेसाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. वळणदार वाटा, ढगांनी वेढलेले डोंगर आणि लहान कॅफेंचा निवांत माहोल हे ठिकाण सुंदर वाटते.

पश्चिम बंगालमधील कुरसियांग हे दार्जिलिंगजवळ वसलेले 'लँड ऑफ व्हाइट ऑर्किड्स' म्हणून प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर असलेल्या या ठिकाणी अप्रतिम चहाचे मळे आणि हिमालयाचे दृश्य अनुभवता येईल. इथे तुम्हाला हेरिटेज वॉक, टी एस्टेट भेट आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा आनंद घेऊ शकता.

केरळमधील कल्पेट्टा हे वायनाड जिल्ह्यातील शांत आणि निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार जंगलांचे दृश्य मन मोहून टाकू शकते. जर तुम्हाला गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा असेल, तर कल्पेट्टा तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे.

आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅली कॉफीच्या बागा आणि आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे तुम्हाला थंड हवा, हिरवेगार टेकड्या आणि सुगंधित कॉफीचा सुगंध प्रवाशांना आकर्षित करतो.

हिमाचल प्रदेशातील तिर्थन व्हॅली ही 'हिमाचलचे बेस्ट कीप्ट सीक्रेट' म्हणून ओळखली जाते. तिथे असणाऱ्या नद्या, बर्फाच्छादित पर्वत आणि हिरव्या दऱ्या अप्रतिम आहेत. ट्रेकिंग, फिशिंग आणि कॅम्पिंगसाठी हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरते.

जम्मू-काश्मीरमधील कोकरनाग हे आपल्या स्वच्छ झऱ्यांसाठी आणि सुंदर बोटॅनिकल गार्डन्ससाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्यात येथील हवामान अतिशय सुखद असते.

उत्तराखंडमधील चकराता हे शांत, हिरवेगार आणि मोहक हिल स्टेशन आहे. इथे तुम्हाला घनदाट जंगलं, धबधबे आणि प्राचीन गुहा यामुळे हे ठिकाण वेगळं भासतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT