Republic Day Fashion
Republic Day Fashion  Saam Tv
लाईफस्टाईल

Republic Day Fashion : रिपब्लिकडेच्या दिवशी थोड वेगळं दिसायचयं , करून पहा तुमच्या फॅशनमध्ये हे बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Republic Day Fashion : येत्या काही दिवसांतचं 26 जानेवारी हा गणतंत्र दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार केला.

संविधान म्हणजे लोकशाही आणि लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चलीवलेले राज्य. आहातच घर (House) , शाळा, कॉलेज , ऑफिस या सगळ्या ठिकाणी या दिवसाला मोठा जल्लोष पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे आनंदी असतात.

या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून शाळा, कॉलेज (College) विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. अशातच सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 26 तारखेला कोणते कपडे घालायचे याचाच विचार सगळी मुले , मुली आणि मोठी मानस सुद्धा करत बसतात.

नटन्याची हाऊस मुलींना भरपूर असते. मुलींचे प्रतेक कार्यक्रमानुसार कोणते कपडे घालायचे ते ठरलेले असतात. अशातच 26 जानेवारीला तुम्ही कोणते कपडे आणि कशा पद्धतीने घालू शकता. हे आम्हीं सांगणार आहोत.

26 जानेवारीला वांशिक पोषाख घालायचा असेल तर मुलींसाठी सफेद रांगाचा कुर्ता आणि पायजमा अतिशय सुंदर दिसेल. त्याचबरोबर ऑल व्हाइट लूक देखिल होऊन जाईन. या ड्रेसमध्ये काही कमी वाटत असेल तर तुम्ही त्यावर भगव्या रंगाची ओढणी घेऊ शकता.

त्याचबरोबर तुम्ही ट्राईकलर रंगाचे कपडे देखील परीधान करू शकता. सफेद कुर्ता, हिरवी पँट आणि भगवी ओढणी असा लुक फारच सुंदर दिसेल आणि तुम्हाला देखील देशासाठीचा अभिमान जास्त प्रमाणात वाटेल. त्याचबरोबर तुम्ही सफेद कुर्ता खाली जीन्सची पँट गळ्यामध्ये हिरव्या डायमंडची नाजूक चैन, आणि भगव्या रंगाचं हातामध्ये बेसलेट घालू शकता.

त्याचबरोबर तुम्हाला कळत नसेल की आपण गणतंत्रच्या दिवशी नेमके काय घालावे तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन साडी आहे. तुम्ही सफेद रंगाची साडी घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही साडीवर हातामध्ये बांगड्या घालण्यासाठी हिरव्या, सफेद आणि भगव्या रंगांच्या बांगड्या वापरू शकता.

यामुळे तुमच्या लूक मध्ये तिरंग्याचा पेहराव दिसून येईल. त्याचबरोबर एथनिक लूक पूर्ण करण्यासाठी अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या तिरंग्याच्या साड्या देखील घालतात. अशातच प्रत्येकजण आपापल्या कलेमधून आपलं देशावरच असलेलं प्रेम त्यांच्या कलागुनांमधून दाखवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT