Thursday Astrological Remedies saam tv
लाईफस्टाईल

Guruwar Ke Upay: गुरुवारच्या दिवशी पडेल पैशांचा पाऊस; फक्त करा ही ५ कामं

Thursday Money Rain : गुरुवार हा गुरु आणि विष्णू यांना समर्पित असल्याचं मानलं जातं. या दिवशी पिवळे कपडे घालणं, उपवास करणं, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं तसंच गुरुमंत्राचा जप करणं आणि केळीच्या झाडाची पूजा करणं हे शुभ मानलं जातं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक आठवडा हा महत्त्वाचा असतो. यामध्ये प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं. यामध्ये गुरुवारच्या दिवस हा खासकरून बृहस्पति आणि भगवान विष्णू यांना समर्पित केला जातो. हा दिवस धन, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानला जातो. शास्त्रानुसार, जर गुरुवारच्या दिवशी काही खास उपाय केले तर आयुष्याने आनंद, आर्थिक प्रगती होते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबाबत माहिती देणार आहोत, जे गुरुवारी केले जातात.हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि धन येण्याची शक्यता असते.

पिवळी वस्त्र घाला

गुरुवारचा रंग पिवळा असतो. हा रंग बृहस्पतीचं प्रतिक असतो. या दिवशी पिवळी वस्त्र परिधान करून पिवळ्या गोष्टीचं दान करणं शुभ मानलं जातं. यामध्ये हळद, डाळ आणि पिवळी फळं तुम्ही दान करू शकता.

गुरु देवाचा व्रत

गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवणं फलदायी मानलं जातं. या दिवश व्रत ठेवणाऱ्या व्यक्तींनी मीठाचं सेवन करू नये. याशिवाय आजच्या दिवशी केवळ पिवळ्या रंगाचं भोजन करावं. व्रत ठेवण्यासोबत भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करावी.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा

गुरुवारी संध्याकाळी, पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणंही एक चांगला उपाय आहे. यासोबत भगवान विष्णूचं ध्यान करा. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी राहते आणि दुर्दैव दूर होऊ शकतं.

गुरु मंत्राचा जप

गुरुवारच्या दिवशी 'ओम ब्रिम बृहस्पतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे गुरुची स्थिती मजबूत होते. जर कुंडलीत गुरु ग्रह अशुभ असेल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

केळीच्या झाडाची पूजा

या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केळीच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जातं. यावेळी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा, हळदीचा टिळक लावा आणि पिवळी फुले अर्पण करा. त्याचप्रमाणे "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT