Guruwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Guruwar che Upay : नोकरी, पैसे, आरोग्य सगळ्या समस्या होतील दूर; गुरुवारच्या दिवशी 'या' गोष्टी करा दान

Thursday che Upay In Marathi: गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णू आणि बृहस्पतिचा मानला जातो. या दिवशी गुरु आणि विष्णूंची पूजा केली जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आज गुरुवारचा दिवस असून हा भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पतिला समर्पित दिवस आहे. या दिवशी भक्त विष्णूची पूजा करतात आणि उपवास देखील ठेवतात. यामुळे भगवान विष्णूंची कृपा भक्तांवर राहते असं म्हटलं जातं. ज्योतिष्य शास्त्रानुसार, जर कोणा व्यक्तीच्या आयुष्यात समस्या असतील तर गुरुवारच्या दिवशी काही उपाय केल्याने त्या समस्या दूर होतात.

गुरुवारच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात नोकरी, जीवन आणि घरासंबंधी असलेल्या समस्या दूर होतात असं मानलं जातं. याशिवाय लक्ष्मी नारायणाची कृपाही व्यक्तीवर राहते. गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

चंदन आणि हळद

गुरुवारच्या दिवशी गरजू लोकांना चंदन आणि हळदीचं दान फलदाजी ठरू शकतं. जर तुमच्या जीवनात सतत समस्या येत असतील तर गुरुवारच्या दिवशी हे उपाय जरूर करा. असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. त्याचप्रमाणे तुमचं आरोग्यंही चांगलं राहण्यास मदत होते.

पिवळी वस्त्र दान करा

ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरुवारी अनेक उपाय सांगण्यात आले आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक मान्यतांनुसार, जर कोणत्या कामात सतत अडथळे येत असतील तर गुरुवारच्या दिवशी पुजारी, पंडित किंवा साधू यांना पिवळी वस्त्र दान करावीत. असं केल्याने व्यक्तीची अडकलेली कामं होऊ लागतात.

औषधं आणि धार्मिक पुस्तकं

गुरुवारच्या दिवशी गरजूंना औषधं दान करणं ही फायद्याचं मानलं जातं. असं केल्याने दररोज येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. शिवाय यामुळे घरातील व्यक्तीचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होण्यास मदत होते.

पिवळी फळं

गुरुवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाची फळं आणि मिठाई दान करणं शुभ मानलं जातं. असं केल्याने व्यक्तीला जर नोकरीमध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत हेतो. यामुळे तुमच्या जीवनात आनंदही येतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: चेहऱ्याला थंडावा आणि नॅचरल ग्लो पाहिजे? मग हा घरी तयार केलेला फेसपॅक नक्की वापरा

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; आधी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार ट्रेन, कधी होणार लोकार्पण?

Diabetes and Tamarind: रक्तातील साखर कमी करण्यासाठी चिंचेच्या बिया उपयोगी? डॉक्टरांचा मोठा खुलासा

भाजपच्या दिग्गज नेत्याच्या एकुलत्या एक मुलाचे भुसावळमध्ये अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT