Cancer Detection Test Saam tv
लाईफस्टाईल

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यासाठी 'ही' एक टेस्ट वाचवेल तुमचा जीव; कमी वेळेत होतं अचूक निदान

Breast Cancer: जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये 2.3 दशलक्षाहून अधिक महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. कॅन्सरचं हे वाढतं प्रमाण धोकादायक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा पहिला नंबर लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये 2.3 दशलक्षाहून अधिक महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. कॅन्सरचं हे वाढतं प्रमाण धोकादायक आहे.

केवळ वृद्ध महिला नाही तर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया शिवाय ज्यांच्या घरी स्तनाच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास आहे आणि BRCA1 आणि BRCA2 म्युटेशन असलेल्या पुरुष आणि स्त्रियांनाही धोका असतो. या कॅन्सरचं निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करता येतात. त्यामुळे यासाठीच कॅन्सरचं निदान होणं महत्त्वाचं आहे. मात्र या कॅन्सरचं निदान होण्यासाठी काय केलं पाहिजे याची महिलांना कल्पना नसते.

डिजिटल मॅमोग्राफी ठरते फायदेशीर

ट्रिविट्रॉन हेल्थकेयरच्या मुख्य अधिकारी सत्यकी बनर्जी यांच्या सांगण्यानुसार, या ठिकाणी डिजिटल मॅमोग्राफी मदत करते. ब्रेस्ट रेडिओग्राफीसाठी फिल्मवर प्रतिमा तयार केल्या जातात. परंतु आता ही पद्धत कमी वापरली जाते. डिजिटल मॅमोग्राफी इलेक्ट्रॉनिक चित्र वापरतं ज्यामध्ये बदल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संग्रहित केलं जाऊ शकतं. उत्तम दर्जाची चित्र स्तनाच्या टिश्यूंना अधिक स्पष्टपणे पाहू शकतात. ज्यामुळे डॉक्टरांना आधीच्या टप्प्यावर संभाव्य समस्या शोधता येतात.

डिजिटल मॅमोग्राफी अधिक प्रगत लो-रेडिएशन इमेजिंग टेक्निकचा वापरतं जी स्तनाच्या टिश्यूंचे इमेज घेते. हे ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि मॅग्निफिकेशनसाठी इमेज ऑप्टिमाइझ करू शकतं. ही क्षमता रेडिओलॉजिस्टना अगदी सूक्ष्म बदल देखील शोधू देण्यास मदत करतं. पारंपारिस मेमोग्रामद्वारे हे लक्षात येणं काहीसं कठीण मानलं जातं.

ज्या महिलांच्या ब्रेस्टचे टिश्यू घट्ट असतात, अशा रूग्णांसाठी फायदेशीर आहे, कारण अशा टिशूंमधील ट्यूमर पारंपरिक मॅमोग्राफीद्वारे शोधणं कठीण आहे. परंतु डिजिटल मॅमोग्राफीसह, डॉक्टर याची माहिती घेऊ शकतात, असंही तज्ज्ञ सत्यकी बनर्जी यांनी सांगितलंय.

डिजीटल मॅमोग्रामचा ब्रेस्ट कॅन्सरसाठी कसा होतो फायदा?

जेव्हा एखादी महिला डिजिटल मॅमोग्राफीसाठी जाते त्यावेळी गाठीचा शोध घेण्यासाठी प्रतिमांचं परीक्षण करतो. यावेळी कोणतीही तक्रार आढल्यास गाठ सौम्य किंवा घातक आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी बायोप्सीसारख्या अतिरिक्त चाचणीची शिफारस केली जाऊ शकते. मात्र डिजिटल मॅमोग्राफीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून अशा समस्या शोधता येतात.

ब्रेस्ट कॅन्सर एक अशी समस्या आहे, ज्याचं लवकर निदान होणं आवश्यक आहे. हा कॅन्सर लवकर आढळल्यास बरा होण्याची शक्यता जास्त असते. नियमित मॅमोग्राफीमुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण 30% ते 40% कमी होतं. या ठिकाणी डिजिटल मॅमोग्राफीचा उपयोग होतो. यामुळे टर्नअराउंड वेळ कमी होतो शिवाय स्क्रीनिंगची अचूकता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : - ‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा - नागपूर महापालिका

Mumbai : ऐन दिवाळीत उडत्या आकाश कंदीलावर ३० दिवसांची बंदी, ड्रोन उडवण्यासही मनाई

Diwali 2025: दिवाळीपूर्वी या वस्तू घरातून बाहेर काढा, नाहीतर माता लक्ष्मी होईल नाराज

SCROLL FOR NEXT