Cancer saam tv
लाईफस्टाईल

Cancer: टॅटू काढत असाल तर व्हा सावधान! टॅटू काढणाऱ्यांना या कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, असं आढळून आलंय की, ज्या लोकांच्या शरीरावर टॅटू असतात त्यांना टॅटू नसलेल्या लोकांपेक्षा त्यांना त्वचा आणि लिम्फोमा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.

Surabhi Jayashree Jagdish

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क (SDU) च्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि क्लिनिकल रिसर्च विभागातील संशोधकांनी हेलसिंकी विद्यापीठासोबत टॅटू शाईच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं आकलन केलं.

'युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क' (SDU) नुसार, टॅटू शाईमध्ये बरीच धोकादायक रसायनं असतात. जी त्वचेच्या आत खूप धोकादायक ठरतात.

ज्यामुळे लिम्फ नोड्सच्या कॅन्सरचा धोका असतो. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी लिम्फ नोड्स खूप महत्वाचे आहेत. यामुळे, असामान्य पेशींची वाढ देखील नियंत्रित होते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, टॅटू शाईमध्ये अनेक धोकादायक रसायनं असतात ज्यामुळे त्वचा, फुफ्फुसं आणि यकृतामध्ये जळजळ होऊ शकते.

इतकंच नाही तर त्यामुळे मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा टॅटू काढण्यासाठी वापरलेली सुई योग्य नसते आणि त्यामुळे रक्ताद्वारे अनेक धोकादायक आजार पसरण्याचा धोका असतो.

यामुळे हिपॅटायटीस सी, एचआयव्ही किंवा एड्स, मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे गंभीर आजार होण्याची धोका असतो.

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, स्वीडनमधील लिंड विद्यापीठातील संशोधकांना टॅटूमुळे कॅन्सरचा धोका आढळून आला आहे. या अभ्यासात असंही आढळून आलं की, टॅटू नसलेल्या लोकांपेक्षा टॅटू असलेल्या लोकांना लिम्फोमाचा धोका २१ टक्के जास्त असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Wrap : जीमला जाणाऱ्या तरुणाईसाठी पनीरचा पौष्टिक नाश्ता, फक्त २ मिनिटात होईल तयार

Rajgad Fort : राजगड किल्ल्याची 'ही' रहस्ये आजही अनेकांना माहित नाहीत, एकदा वाचाच

Night Dinner: रात्रीच्या जेवणात हे ७ पदार्थ खाताय? त्यामुळेच वाढत असेल तुमचं वजन

Maharashtra News Live Update: अहिरे गावात मध्यरात्री चोरीचा थरार, सहा चोरट्यांचा धुमाकूळ CCTV मध्ये कैद

Rhiya Ahir: आंदोलनातील'त्या' व्हायरल व्हिडीओने रिया अहिरचं टेन्शन वाढवलं, थेट सायबर सेलकडे तक्रार

SCROLL FOR NEXT