Warning signs before a heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms: हार्ट येण्याच्या काही तासांपूर्वी दिसून येतात ही लक्षणं; शरीरात बदल ओळखून डॉक्टरांची मदत घ्या

Heart attack symptoms hours before: हृदयविकाराचा झटका हा गंभीर आरोग्याचा प्रश्न आहे. अनेकदा झटका येण्याआधी काही तासांपूर्वी शरीरात काही लक्षणं दिसतात. ही लक्षणं ओळखल्यास वेळेत उपचार मिळू शकतात आणि जीव वाचू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक समस्या उद्भवतात. यामधील एक समस्या म्हणजे हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या समस्या...तज्ज्ञ म्हणतात की, हृदयासंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्याची लक्षणं तुमच्या शरीरात दिसून येतात. त्यामुळे आपण शरीरात होणाऱ्या प्रत्येक छोट्या बदलांकडे लक्ष दिलं पाहिजे.

अनपेक्षित थकवा, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास ही नेहमीच गंभीर आजाराची स्पष्ट लक्षणं नसतात. मात्र अनेकदा ही लक्षणं हार्ट अटॅक येण्यापूर्वी देखील दिसून येतात. काही अभ्यासांनुसार, दहा पैकी चार लोकांना हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी काही दिवस किंवा आठवडे शरीराकडून असे संकेत मिळतात.

न जाणारा थकवा

पुरेशी झोप झाल्यानंतरही हाडापर्यंत जाणवणारा थकवा हा मोठा इशारा आहे. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटले तरी दुपारपर्यंत पूर्णपणे थकल्यासारखं वाटतं. महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसतं. यामध्ये हृदय रक्त नीट पंप करू शकत नसल्यामुळे शरीराची ऊर्जा संपते. त्यामुळे असा थकवा जाणवतो.

झोपेदरम्यान अस्वस्थता

झोप येत असूनही सतत अस्वस्थ वाटणं किंवा झोपेत अचानक श्वास घ्यायला त्रास होणं ही गंभीर लक्षणं आहेत. ही लक्षणं देखील महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. झोपताना हृदय नीट काम करू शकत नाही, त्यामुळे अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.

छातीत वेदना नसली तरी अस्वस्थता

कधी कधी छातीत दाब, जडपणा किंवा अस्वस्थ वाटल्याची भावना मनात येते. हे लक्षण जवळपास 68 टक्के लोकांमध्ये दिसतं. अशावेळी वेदना हात, जबडा किंवा खांद्यापर्यंत गेल्यास धोका अधिक वाढतो.

श्वास घेण्यास त्रास

अगदी विश्रांती घेताना देखील श्वास घेण्यास त्रास होणं हे हृदय नीट रक्तपुरवठा करू शकत नसल्याचं लक्षण आहे. यामुळे फुफ्फुसांना जास्त काम करावं लागतं. छातीमध्ये वेदना नसल्यासही अनेकांना श्वास घेण्यास त्रास होताना दिसतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

थंड घाम येणं

थंड हवेतही अंगावर घाम येणं किंवा पोटाशी संबंधित त्रास नसताना मळमळ होणं हे शरीरात ताण निर्माण झाल्याचं लक्षण असतं. हृदयावर ताण आल्यामुळे शरीरातील फाइट ऑर फ्लाइट सिस्टीम एक्टिव्ह होते. महिलांमध्ये छातीत वेदना न होता पोटात अस्वस्थता जाणवू लागते. ही लक्षणं साधी वाटली तरी तातडीने डॉक्टरांची मदत घेऊन टेस्ट करून घ्यावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT