Best Couple Honeymoon Places in India Saam Tv
लाईफस्टाईल

Couple Honeymoon Place : मार्च महिन्यामध्ये हनीमून सेलिब्रेट करण्यासाठी परफेक्ट आहेत भारतातील 'या' जागा

Couple Travel : अनेक कपल्सने मार्च महिन्यामध्ये फिरण्याचा प्लान केला असेल. परंतु डेस्टिनेशनला घेऊन कपल्स चिंतेत दिसत आहेत.

कोमल दामुद्रे

Best Honeymoon Destination : सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. अशातच सगळीकडे मंगलमय वातावरण पसरलेलं पाहायला मिळतय. अनेक जोडपे एकमेकांसोबत लग्न गाठ बांधण्यासाठी आतुर झाले आहेत आणि लग्न झालेले जोडपे हनीमुनच्या तयारीमध्ये आहेत.

अशातच अनेक कपल्सने (Couple) मार्च महिन्यामध्ये फिरण्याचा प्लान केला असेल. परंतु डेस्टिनेशनला घेऊन कपल्स चिंतेत दिसत आहेत. जर तुम्ही सुद्धा मार्च महिन्यामध्ये हनिमून सेलिब्रेट करण्यासाठीचा प्लान करत असाल तर, आपल्या देशामध्ये (Country) आलेल्या या ठिकाणांवरती तुम्ही जाऊ शकता.

1. लक्षद्विप :

जर तुम्हाला तुमच्या पार्टनर (Partner) सोबत एखाद्या रोमांटिक डेस्टिनेशनवर जाऊन हनिमून सेलिब्रेट करायचे असेल तर, तुम्ही लक्षदीपि येथे जाऊ शकता. लक्षदीप येथे फिरण्यासाठी लक्षदीप मिनीकॉय द्वीप, बांगरम द्वीप, कारवत्ती द्वीप, मरीन संग्रहालय, कदमत आयलँड या ठिकाणी जाऊ शकता.

2. वयनाड :

तुम्ही हनीमून सेलिब्रेशनसाठी केरला येथे जाऊ शकता. केरळ हे प्राकृतिक सुंदरतेसाठी संपुर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याला हनीमून, बेबीमुन आणि प्रे वेडिंग डेस्टिनेशन सुद्धा म्हटले जाते. यासाठी तुम्ही वायनाड येथे जाऊ शकतात. वायनाड अतिशय सुंदरतेने नटलेलं ठिकाण आहे. सोबतच संपूर्ण जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

3. हंपी :

कपल्ससाठी हंपी हे एक आकर्षण केंद्र आहे. मोठ्या संख्येमध्ये लोक हंपी येथे फिरायला जातात. सोबतच तुम्ही हनिमून सेलिब्रेशन करण्यासाठी हंपी येथे जाऊ शकतात. या महिन्यांमध्ये हंपीचे वातावरण अतिशय आनंदी असते.

4. कश्मीर :

कश्मीर या ठिकाणाला जगामधील धरतीवर असलेले स्वर्ग मानले जाते. कश्मीरमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रमुख स्थळ आहेत. तुम्ही तुमच्या हनीमुनला अविस्मरणीय बनवण्यासाठी कश्मीरला जाऊ शकता. खासकरून मार्च महिन्यामध्ये ट्युलीप गार्डन फिरू शकता. सोबतच डल झिलवर बोटीचा आनंद घेऊ शकता.

5. गोवा :

गोवा पर्यटकांसाठी प्रमुख स्थळ मानले जाते. प्रत्येक ऋतूमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून गोवा फिरण्यासाठी येतात. तुम्ही तुमच्या हनिमून सेलिब्रेशनसाठी गोवा हे ठिकाण निवडू शकता. तूम्ही तुमच्या पार्टनरसोबत गोव्यावरील बीचचा आनंद लुटू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT