Why Taste Buds Change saam tv
लाईफस्टाईल

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Why Taste Buds Change: अनेकदा एखादा चवदार पदार्थ देखील आपल्याला टेस्टी लागत नाही. जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर हे धोकादायक आहे.

Surabhi Jagdish

कोणताही पदार्थ असेल आपण तो नेहमी चवीने खातो. चमचमीत आणि चवदार पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं. एखाद्या पदार्थाची उत्तम टेस्ट म्हणजेच चव देणं ही आपल्या जीभेची जबाबदारी असते. मात्र अनेकदा एखादा चवदार पदार्थ देखील आपल्याला टेस्टी लागत नाही.

जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर हे धोकादायक आहे. याचं कारण म्हणजे योग्य चव न लागणं हे अनेक गंभीर आजारांचं लक्षण आहे. जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा आपल्या जिभेची चव आणि रंग देखील बदलतो. म्हणूनच डॉक्टर अनेकदा उपचार करताना तुमची जीभ देखील तपासतात.

आरोग्याच्या कोणत्या समस्यांमध्ये बदलते चव?

ताप

ज्यावेळी एखाद्याला ताप येतो तेव्हा जिभेची चव कमी होऊ शकते. ही एक सामान्य शारीरिक समस्या आहे.

मधुमेह (Diabetes)

मधुमेही रूग्णांना देखील चवीत बदल जाणवू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा त्यांच्या जिभेच्या चवीत बदल होतात.

डेंटल प्रॉब्लम्स (Dental Problems)

दातांच्या समस्यांमुळे तुमच्या चवीवरही परिणाम होतो. हिरड्यांना आलेली सूज किंवा तोंड स्वच्छ न ठेवल्यामुळे अशा समस्या उद्भवल्या की तुम्हाला योग्य चव लागू शकत नाही.

न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्स (Neurological Problems)

काही न्यूरोलॉजीकल समस्यांमुळे देखील ही तक्रार उद्भवते. पार्किन्सन रोग, अल्झायमर किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या अनेक न्यूरोलॉजिकल आजारांमुळे जिभेच्या चवीत बदल होऊ शकतात.

सर्दी-खोकला

खोकला आणि सर्दीमुळेही जिभेची चव कमी होऊ शकते. सर्दी आणि खोकल्यामुळे नाक बंद होण्याची तक्रार उद्भवल्याने ही समस्या निर्माण होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT