Second heart attack symptoms SAAM TV
लाईफस्टाईल

Second heart attack risk: दुसऱ्यांदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल, वेळीच लक्षणं ओळखा

Second heart attack symptoms: ज्यांना एकदा हार्ट अटॅक आलाय अशा व्यक्तींना पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सामान्य लोकांपेक्षा जास्त असतो. पहिल्या झटक्यानंतर हृदय काही प्रमाणात कमकुवत झालेलं असू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅक येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा आला की हार्ट अटॅक येतो. दरम्यान एखाद्या व्यक्तीला दोन वेळा देखील हार्ट अटॅक येऊ शकतात. यावर उपचार म्हणजे अँजिओग्रामद्वारे बंद झालेल्या धमनीचा शोध घेऊन ती बलूनच्या मदतीने उघडणं. या प्रक्रियेमध्ये अनेकदा स्टेंटही बसण्यात येतो.

दुसरा हार्ट अटॅक येण्यामागे प्रमुख कारण

हार्ट अटॅक येण्यामागे प्रमुख कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल. तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिकच वाढतो. जे लोक कमी प्रमाणात व्यायाम करतात किंवा जास्त जंक फूड खातात त्यांच्यात LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. LDL ची पातळी ही आनुवंशिक घटकांवरही अवलंबून असू शकते.

मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, धूम्रपान, तणाव, लठ्ठपणा, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, जंक फूड आणि चुकीचा आहार ही देखील दुसरा हार्ट अटॅक येण्यामागे कारणं आहेत. या गोष्टी रूग्णाने सुधारल्या नाही तर धमन्यांमध्ये नवीन अरुंद भाग तयार होऊ शकतात. अशावेळी आधीपासून असलेली अरुंदता वाढू शकते. त्याचप्रमाणे बसवलेल्या स्टेंटमध्ये पुन्हा टिश्यू वाढून तेही अरुंद होऊ शकतो.

एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर रूग्णाला बरं वाटू लागल्यावर ते निष्काळजीपणा करतात. यामध्ये ते पुन्हा सिगारेट ओढू लागतात, गोड आणि जंक फूड खाऊ लागतात. तर काही लोक ओळखीच्या लोकांचा सल्ला घेऊन डॉक्टरांनी दिलेली औषधं मध्येच बंद करतात. यामुळे देखील हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो.

दुसरा हार्ट अटॅक येण्यापूर्वी काय दिसून येतात लक्षणं

  • छातीत दुखणं

  • धाप लागणं

  • हृदयाची धडधड वाढणं

  • लवकर थकवा येणं

दुसरा हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे?

दुसऱ्यांदा हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे. यामध्ये योग्य आहार घेणं हा पहिला नियम आहे. जास्त साखर, गोड पदार्थ आणि रिफाइंड तेल आहारात टाळावं. दूध, दही, लोणी, देशी तूप, अंडी, मासे, चिकन, फळं, भाज्या, अक्रोड-बदामसारखे सुकामेवा या गोष्टी योग्य प्रमाणात खाऊ शकता.

योग्य व्यायाम महत्त्वाचा

हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आठवड्यात किमान पाच दिवस रोज ३० ते ४५ मिनिटं चालणं फायदेशीर ठरतं. आठवड्यातून दोनदा योग्य व्यायाम केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य औषधं नियमित घेणं तितकंच आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन आणि थायरॉईड नियंत्रणात ठेवावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमदावारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT