Symptoms of bad cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Symptoms of bad cholesterol: वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात होऊ लागतात 'हे' बदल; पाहा कोलेस्ट्रॉल तपासण्याची योग्य वेळ कोणती?

Body changes with high cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल वाढणे हे हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे, पण अनेकदा याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयरोगाचे गंभीर कारण असू शकते.

  • डोळ्यांभोवती पिवळसर डाग याचे संकेत आहेत.

  • वयापूर्वी कॉर्नियाभोवती पांढरे वर्तुळ चिंतेचे कारण.

जास्त प्रमाणात वाढलेलं वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) शरीरात हळूहळू साचत जातं. अशावेळी त्याची लक्षणं लगेच दिसत नाहीत. त्यामुळेच त्याला ‘लपलेला धोका’ म्हटलं जातं. काहीवेळा शरीर या धोक्याची सूक्ष्म चिन्हं आधीच दाखवू लागतं. ही सुरुवातीची लक्षणं ओळखली तर वेळेवर उपाय करून हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारखे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

डोळ्यांभोवती अचानक पिवळसर डाग दिसणं

डोळ्यांच्या पापण्यांजवळ पिवळसर गाठीसारखे किंवा सपाट डाग दिसू लागले तर ते त्वचेखालील कोलेस्ट्रॉलचे थर असू शकतात. हे वेदनादायक नसतात पण रक्तात LDL किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढल्याचं हे संकेत असू शकतात. अशावेळी डॉक्टर बहुधा कोलेस्ट्रॉल चाचणी करण्याचा सल्ला देतात.

डोळ्यांच्या बाहुलीभोवती पांढरं वर्तुळ दिसणं

वय वाढल्यानंतर कॉर्नियाभोवती पांढरा किंवा करडा वर्तुळ दिसणं सामान्य असू शकतं. मात्र, हे वयाच्या 45 वर्षांपूर्वी दिसू लागलं तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचं किंवा लिपिडचं लक्षण असू शकतं. यामुळे दृष्टीवर परिणाम होत नाही पण शरीरातील LDL वाढीचा हा शांत इशारा असू शकतो.

हात-पाय सुन्न होणं

वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने लहान रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि टोकाच्या भागांपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हात-पायांमध्ये झिणझिण्या येणं, सुन्नपणा किंवा ‘सुई टोचल्यासारखी’ भावना होऊ शकते. इतर अनेक कारणांनीही हे होऊ शकतं पण हे लक्षण कारणाशिवाय वारंवार जाणवलं, तर कोलेस्ट्रॉलची तपासणी गरजेची आहे.

चावताना जबड्यात वेदना होणं

चेहरा आणि जबड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक साचल्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. अशावेळी चावताना किंवा जास्त वेळ बोलताना जबड्यात वेदना जाणवू शकते. हे लक्षण दुर्मिळ असलं तरी इतर लक्षणांसोबत दिसल्यास कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद झाल्याचे संकेत असू शकतात.

वारंवार अपचन होणं

बहुतेक वेळा अपचनाचं कारण आहार किंवा अॅसिडिटी असतं. पण काही वेळा पोटात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळेही जेवणानंतर हलका त्रास जाणवू शकतो. हा त्रास सतत होत असेल आणि आहारात काही कारण नसेल तर तो कोलेस्ट्रॉलशी संबंधित असण्याची शक्यता असते.

कोलेस्ट्रॉल तपासण्याची योग्य वेळ

लक्षणं दिसण्यापूर्वीच तज्ज्ञ निरोगी प्रौढांनी दर 4-6 वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणी करून घ्यावी, तर ज्यांना कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब आहे, त्यांनी हे अधिक वारंवार करावं.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

डोळ्यांभोवती पिवळसर डाग, कॉर्नियाभोवती पांढरे वर्तुळ, हात-पायांमध्ये सुन्नपणा, चावताना जबड्यात वेदना आणि वारंवार अपचन ही कोलेस्ट्रॉल वाढल्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

डोळ्यांभोवती पिवळसर डाग का दिसतात?

डोळ्यांच्या पापण्यांजवळ त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा होऊन पिवळसर डाग तयार होतात.

वयापूर्वी कॉर्नियाभोवती पांढरे वर्तुळ का चिंतेचे कारण आहे?

४५ वर्षांपूर्वी कॉर्नियाभोवती पांढरे वर्तुळ दिसणे लिपिड उच्च असल्याचे संकेत देते आणि हृदयरोगाचा धोका वाढवते.

हात-पाय सुन्न होण्याचे कारण काय?

वाईट कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन टोकाच्या भागांपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे हात-पायांमध्ये सुन्नपणा येतो.

कोलेस्ट्रॉल तपासणी केव्हा करावी?

निरोगी प्रौढांनी दर ४-६ वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणी करावी. कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब असल्यास ती अधिक वारंवार करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT