Garuda Purana Secret saam tv
लाईफस्टाईल

Garuda Purana katha: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसून येतात 'या' गोष्टी; गरूड पुराणात दिलंय वर्णन

Garuda Purana Secret: शास्त्रानुसार, आत्म्याला कर्मानुसार फळं भोगावी लागतात. गरूण पुराणात, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं याशिवा आत्म्याला कोणता आणि कसा प्रवास करावा लागतो, याबाबत सांगण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये १८ महापुराण असून यामध्ये गरूड पुराणाचा समावेश आहे. मुळात गरूड पुराण हा एक प्रसिद्ध ग्रंथ असून यामध्ये मृत्यूनंतरच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. गरूड पुराणात एकूण १९ हजार श्लोक आहेत आणि त्याचे २ भाग आहेत. हा ग्रंथ भगवान विष्णु यांना समर्पित आहे. यामुळे याला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे.

धार्मिक मान्यतांनुसार, गरूड पुराणाचं पठन केल्याने मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय मृत्यू झालेल्या परिवारातील सदस्यांना अध्यात्मिक शांती देखील मिळते. यासोबतच अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती देखील होते. असं म्हणतात की, गरूड पुरुणात मृत्यूपूर्वी दिसणाऱ्या काही संकेताची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये व्यक्तीला कोणत्या गोष्टी दिसतात ते पाहूयात.

पितरांचं दर्शन

गरूड पुराणात या गोष्टीबाबत माहिती देण्यात आली आहे की, मृत्यू पूर्वी काही दिवस अगोदर व्यक्तीला पितर दिसू लागतात. असं मानलं जातं की, मृत्यू जवळ असल्यास पितर दिसू लागतात

प्रतिबिंब दिसत नाही

गरूड पुरणानुसार, व्यक्तीला त्याच्या अखेरत्या काळात काही अशुभ संकेत दिसून येतात. यामध्ये संबंधित व्यक्तीला मृत्यू पूर्वी पाणी, तेल, तूप किंवा काच यामध्ये प्रतिबिंब दिसून येत नाही. असं म्हटलं जातं की, असे संकेत दिसत असतील तर व्यक्तीचा अंतिम काळ जवळ असतो.

रहस्यमयी दरवाजा

असं म्हटलं जातं ज्यावेळी व्यक्ती अखेरचे श्वास घेतो तेव्हा त्याला एक रहस्यमयी दरवाजा दिसू लागतो. गरूड पुराणानुसार, या दरवाजामधून पांढरा प्रकाश आणि तीव्र किरणं दिसून येतात.

यमदूत दिसणं

काही व्यक्तींना मृत्यू जवळ आला की यमदूत दिसतो, असंही गरूड पुराणात नमूद करण्यात आलं आहे. असं मानलं जातं की, यमदूत दिसल्यानंतर व्यक्तीचा शेवटची वेळ जवळ आलीये असं म्हटलं जातं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT