Kidney Damage Risk saam tv
लाईफस्टाईल

Kidney Damage Risk: निरोगी किडनीला आतून पोखरतायत या 4 सवयी; तुम्हालाही असतील तर आजच बदलून टाका

Kidney Disease Prevention: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या कोणत्या सवयी बदलायला हव्यात? धूम्रपान, जास्त मीठ असलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि कमी पाणी पिण्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. किडनीचे आजार टाळण्यासाठी या चार महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनात किडनीच्या आजारांचा धोका वाढताना दिसतोय. आपल्या शरीरातील घाण आणि टॉक्सिन घटक बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम किडनी करते. किडनी रक्तातील घाण वेगळी करून ती लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. पण किडनीचं काम नीट झालं नाही तर शरीरात विषारी घटक साचू लागतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि इतर आजारांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे किडनी निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे.

आपल्या रोजच्या काही सवयी किडनीला नुकसान पोहोचवू शकतात. या सवयी वेळीच बदलल्या तर किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या ४ सवयी सोडायला हव्यात.

धूम्रपान करण्याची सवय सोडा

सिगारेट, हुक्का, बिडी आणि गांजा यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. याचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही तर किडनीवरही होतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे किडनीपर्यंत रक्त पोहोचण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

आहारातून अनारोग्यकारक पदार्थ कमी करा

आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या किडनीच्या आरोग्यावरही होतो. सतत बाहेरचे पदार्थ आणि अनहेल्दी पदार्थ अन्न खाल्ल्याने किडनीला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे आहारात योग्य बदल करणं गरजेचं आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं कमी करा. अशा पदार्थांचं सतत सेवन केल्याने किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

दररोज व्यायाम करा

सतत बसून राहणं आणि कोणतीही शारीरिक हालचाल न करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज थोडा वेळ व्यायाम किंवा इतर शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. याचा फायदा किडनीच्या आरोग्याला होतो.

पुरेशा प्रमाणात पाणी पिणं

किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. किडनी शरीरातील घाण आणि टॉक्सिन घटक बाहेर काढण्याचं काम करते. यासाठी शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर किडनीच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा

HUL Price Hike: कपडे धुणं आता महागणार! Surf Excel, Rin आणि Wheel महागले; साबणाच्या किमतीतही वाढ, पाहा नवे दर

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बळीराजा दिन साजरा

सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच का गुंडाळले जातात? जाणून घ्या कारण

Death News: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध सिनेनिर्मात्याचं निधन; सेटवरच घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT