High blood pressure symptoms saam tv
लाईफस्टाईल

High blood pressure: ब्लड प्रेशर वाढल्यावर दिसून येतात 'ही' ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास हॉर्ट अटॅक, स्ट्रोकचा बळावतो धोका

High blood pressure symptoms: हायपरटेन्शन हा एक गंभीर आरोग्यविषयक आजार आहे, ज्याला अनेकदा 'सायलेंट किलर' असे म्हटले जाते. कारण, सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

  • रक्तदाब 120/80 mmHg पेक्षा जास्त असतो आणि ही स्थिती सुरुवातीला कोणतीही लक्षणं न दाखवता शरीराला नुकसान करते.

  • तीव्र डोकेदुखी, धुसर दिसणं, छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास ही गंभीर लक्षणं आहेत.

  • मेंदूतील आणि डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर दाब येऊन त्या दुखावल्या जातात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या रक्ताचा दाब हा सामान्य पातळीपेक्षा अधिक असतो. सरासरी प्रमाण 120/80 mmHg मानलं जात असलं तरी, वय, लिंग, वजन आणि शरीराच्या स्थितीनुसार हे बदलू शकते. हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर देखील म्हटलं जातं. याचं कारण सुरुवातीला याची कोणतीही ठोस लक्षणं दिसत नाहीत.

मात्र ज्यावेळी ही दिसायला लागतात, तेव्हा फार उशीर झालेला असतो. इतकंच नाही तर शरीराचं फार नुकसानही झालेलं असतं. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर यासारखे गंभीर आजार होण्याचा धोकाची असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच लक्षणांबाबत सांगणार आहोत जी दिसून लागल्यास तुम्ही तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

तीव्र डोकेदुखी

जर तुम्हाला खूप तीव्र डोकेदुखी होत असेल तर हे उच्च रक्तदाबाचं सर्वसामान्य पण गंभीर लक्षण आहे. ही दुखणं अचानक सुरू होतं आणि खूप तीव्र असतं. हे दुखणं सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळ असतं.

का होतं असं?

उच्च रक्तदाबामुळे मेंदूमधील रक्तवाहिन्यांवर ताण येतो. हा दाब जर खूप वाढला तर त्या नाजूक रक्तवाहिन्या दुखावू शकतात किंवा फुटूही शकतात. त्यामुळे असं अचानक डोकं दुखायला लागल्यास आणि आधीच BP वाढत असेल तर तातडीनं उपचार घ्यावेत.

धुसर दिसणं

ब्लड प्रेशर वाढलं असल्यास डोळ्यांतील बारिक रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. या रक्तवाहिन्या जर आखूड, जाडसर असतील तर त्याचा थेट परिणाम आपल्या दृष्टीवर होतो. असं झालं की, दृष्टी धुसर होते आणि डोळ्यासमोर डॉट्स किंवा हलके प्रकाश दिसू लागतात. या लक्षणांचा अर्थ असा असतो की, फक्त हृदयच नाही, तर तुमच्या संपूर्ण शरीराचं नुकसान होतंय. जर या लक्षणांसोबत डोकेदुखी किंवा चक्कर येण्याची समस्याही जाणवत असेल तर ते तातडीनं तपासून घ्यावं.

छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास

छातीत जडपणा, वेदना किंवा श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं अतिशय गंभीर मानली जातात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो. ज्यामुळे छातीत दुखणं किंवा जडपणा जाणवतो. याशिवाय व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. कधी कधी फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्याचंही लक्षण असू शकतं. रक्तदाब सातत्याने वाढल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

दुर्लक्ष करणं पडेल महागात

  • स्ट्रोक

  • हार्ट अटॅक

  • किडनी फेल्युअर

  • हृदय निकामी होणं

स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल?

  • नियमित BP तपासणी करा

  • जीवनशैलीत बदल करा

  • औषधं नियमित घ्या

  • लक्षणांवर लक्ष ठेवा

हायपरटेन्शन म्हणजे काय?

जेव्हा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याला हायपरटेन्शन म्हणतात

उच्च रक्तदाबाची लक्षणं कोणती?

तीव्र डोकेदुखी, धुसर दिसणं, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो.

उच्च रक्तदाबामुळे कोणते धोके संभवतात?

स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, हृदय निकामी होणं.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं?

नियमित तपासणी, आहार व व्यायाम, औषधं घेणं आणि तणाव टाळणं.

डोळ्यासमोर प्रकाश किंवा धुसर दिसणं का होतं?

डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर ताण आल्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT