Pediatric Kidney Cancer saam tv
लाईफस्टाईल

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Childhood kidney cancer: लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या विल्म्स ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं जाणून घ्या. पोटात सूज, लघवीत रक्त, वारंवार ताप आणि अशक्तपणा यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

लहान मुलांमध्ये आढळणारा किडनीचा कॅन्सर म्हणजेच विल्म्स ट्यूमर हा दुर्मिळ आजार मानला जातो. हा आजार जर वेळेत ओळखला गेला नाही तर तो गंभीर ठरू शकतो. विशेषतः 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणं स्पष्ट नसल्याने अनेकदा पालकांचं त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र काही संकेत असे आहेत, जे कधीही दुर्लक्षित करू नयेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दुर्लक्षित केलं जाणारं लक्षण

या आजारामध्ये सर्वात सुरुवातीचं आणि अनेकदा दुर्लक्षित होणारं लक्षण म्हणजे मुलाच्या पोटात दिसणारी सूज किंवा गाठ. ही गाठ तयार झाली की वेदना होत नाहीत. अनेक पालकांना ती मुलाला अंघोळ घालताना किंवा खेळताना अचानक जाणवते. साध्या पोटफुगीप्रमाणे ही सूज कमी-जास्त होत नाही.

काही पालक याला बद्धकोष्ठता किंवा तात्पुरती पोटाची समस्या समजून दुर्लक्ष करतात. अशावेळी जर पालकांना मुलांमध्ये ही सूज कायम दिसत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वारंवार येणारा ताप

त्याचप्रमाणे वारंवार येणारा ताप हे देखील एक महत्त्वाचं लक्षण ठरू शकतं. मुलांना हवामान बदलामुळे किंवा व्हायरल संसर्गामुळे ताप येणं सामान्य आहे. मात्र कोणतंही स्पष्ट कारण नसताना सतत ताप येत असेल तर तो शरीरातील अंतर्गत समस्येचा संकेत असू शकतो. विल्म्स ट्यूमरच्या अनेक रुग्णांमध्ये थकवा, भूक कमी लागणं आणि सतत अशक्तपणा जाणवण्याची तक्रारही दिसून येते.

लघवीत रक्त दिसणं

लघवीत रक्त दिसणं हे देखील गंभीर लक्षणांपैकी एक आहे. काही वेळा लघवीचा रंग किंचित गुलाबी दिसू शकतो. तर काही प्रकरणांमध्ये तपासणी केल्यानंतरच रक्त असल्याचं निदर्शनास येतं. अनेकदा याला साधं युरीन इन्फेक्शन समजण्यात येतं. मात्र वारंवार लघवीत रक्त दिसत असेल तर डॉक्टरांना दाखवून योग्य ती तपासणी केली पाहिजे.

कंबरेच्या बाजूला वेदना

काही मुलांना पोटात किंवा कंबरेच्या बाजूला वेदना जाणवू शकतात. विशेषतः धावणं किंवा खेळताना हा त्रास अधिक जाणवतो. अनेक पालक याकडे गॅस, मसल पेन किंवा साध्या दुखण्याप्रमाणे पाहतात. पण एका ठिकाणी सतत वेदना होत असतील, तर त्यामागे गंभीर कारण असू शकतात. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये नियमित तपासणीदरम्यान मुलांचा रक्तदाब वाढलेला देखील आढळतो. डॉक्टरांच्या मते, ट्यूमर किडनीवर दबाव टाकत असल्यामुळे असे होऊ शकते.

लहान वयातील किडनीच्या कॅन्सरची अनेक लक्षणं सुरुवातीला सौम्य आणि अस्पष्ट असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शरीरात होणारे बदल याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेत निदान झाल्यास हा आजार ९० टक्के बरा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT