Benefits of walking, Fitness, walking benefits in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Benefits of walking: नियमित चालल्याने शरीराला होतील अनेक फायदे!

शरीराला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक व्यायाम किंवा योगासने करतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता सुरळीत सुरू राहते. नियमित जितका वेळ आपण चालतो तितक्या जलद गतीने कॅलरी घटण्यास मदत मिळते.(Benefits of walking in Marathi)

हे देखील पहा -

शरीराला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक व्यायाम किंवा योगासने करतो. शरीराला फिट ठेवण्यासाठी चालणे अधिक फायदेशीर ठरू शकतो. याव्यतिरिक्त चालण्याने आपल्या शरीरातील रक्तातील शर्करादेखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. चालल्याने ताण हलका होण्यास मदत होते. तसेच नैराश्याला सामोरे जाणाऱ्यांना अधिकाधिक चालण्याचा सल्ला दिला जातो. मनावर ताण जाणवत असल्यास किंवा टेन्शन आल्यास आपल्या क्षमतेनुसार वेगाने चाला. चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते. ऑक्सिजन आणि इतर पोषणमूल्यं शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. चालल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घ्या.

१. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. हा व्यायाम करण्यासाठी सहज व सोपा व्यायाम प्रकार आहे. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय आपण हा व्यायाम सहज करु शकतो.

२. चालल्याने आपले शरीर तंदुरुस्त व चपळ ठेवण्यासाठी मदत होते. सकाळी चालण्यामुळे वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा करतो. मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व (Vitamins) सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

३. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. चालण्यामुळे तणाव (Stress) आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे झोपही चांगली लागते. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा चालणे हा उत्तम मार्ग ठरेल. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते तसेच चरबीचे प्रमाण कमी होते. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT